लाखांदूर तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:37 AM2021-05-21T04:37:20+5:302021-05-21T04:37:20+5:30

गत अनेक वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसाय अंतर्गत तालुक्यातील १२ दुग्ध ...

Dairy farmers in Lakhandur taluka in financial crisis | लाखांदूर तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

लाखांदूर तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

Next

गत अनेक वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसाय अंतर्गत तालुक्यातील १२ दुग्ध संकलन केंद्रांतर्गत दुधाचे संकलन केले जात आहे. तालुक्यातील या केंद्रामध्ये रोहणी, कुडेगाव, गवराळा , डांभेविरली, खैरी पट, लाखांदूर, मडेघाट, तावशी, बारव्हा, जैतपूर , भागडी व पाहुनगाव आदी १२ केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांतर्गत नियमित एक हजार लिटर दुधाची खरेदी केली जात आहे. कोरोना परिस्थितीत आधीच तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दूध डेअरी अंतर्गत खरेदी केलेल्या दुधाची रक्कम अदा केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत शासन व दुग्ध डेअरी चालकांनी दखल घेत खरेदी केलेल्या दुधाची रक्कम तत्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बॉक्स

दुधाच्या किमतीत घसरण

कोरोना पार्श्वभूमीवर गत दीड महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील काही शेतकरी दुधाचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसाय अंतर्गत गत एक महिन्यापूर्वी दूध २८ रुपये ५० पैसे प्रति लिटर या दराने खरेदी केले जात होते. मात्र लॉकडाऊन सुरु होताच या किमतीत तब्बल ७ रुपयांची घसरण होत २१ रुपये ५० पैसे प्रति लिटरच्या दराने दूध खरेदी केले जात आहे.

Web Title: Dairy farmers in Lakhandur taluka in financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.