कालव्यात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:59 PM2017-09-27T23:59:27+5:302017-09-27T23:59:37+5:30

The death of masculine and immersion in the canal | कालव्यात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू

कालव्यात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देबावनथडीच्या मुख्य कालवा शिवारातील घटना : मिरगीचा झटका आल्याने दुचाकीसह कालव्यात पडले

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : धोबीटोला (मध्यप्रदेश) येथून दुचाकीने घरी परतीच्या मार्गावर असताना दुचाकी चालवित असताना मिरगीचा अचानक झटका आला. त्यानंतर भरधाव दुचाकी वळण मार्गावरील बावनथडीच्या मुख्य कालव्यात कोसळल्याने काका पुतण्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारला पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
कैलास हिरामण भट (३८), अमित सदाशिव भट (१६) रा.आलेसूर ता.तुमसर असे मृत काका पुतण्याचे नाव आहे. कैलास भट हा मिरगी या आजाराने पीडित असल्यामुळे त्याला दुचाकी किंवा वाहन चालविण्यासाठी कुटुंबीयांनी मनाई केली होती. मात्र कैलास हा पुतण्या अमितला सोबत दुचाकी क्र. (एमएच४०/एफ २३१७) ने २४ सप्टेंबर रोजी धोबीटोला जि.बालाघाट येथे बहिणीकडे गेला होता. त्यादिवशी मुक्काम करून दुसºया दिवशी दुपारी ३ वाजता तिथून निघाला. परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी पोहचला नाही. कैलासला मिरगी येऊन तो वाटेत पडला असावा, असा संशय आल्याने नातेवाईकांनी आलेसूर ते धोबीटोला रस्ता रात्रीच पिंजून काढला. मात्र त्याचा काही सुगावा लागला नाही. त्यामुळे मंगळवारला दुपारपर्यंत नातेवाईकांनी शोधाशोध केली. परंतु काहीच माहिती मिळत नसल्यामुळे नातेवाईकांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविली.
दरम्यान बावनथडी प्रकल्पाच्या नहरात पाणी सोडले असल्याची माहिती ठाणेदार किशोर झोटींग यांना येताच त्यांनी नहराच्या दिशेने पोलीस चमूला शोध घेण्यासाठी पाठविले. मुख्य कालव्यातून पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे कालव्यात काहीच दिसून आले नाही. त्यामुळे तपास कार्यासाठी बावनथडीचे दरवाजे बंद करण्यात आले. पाण्याचा प्रवाह कमी होताच कालव्यात शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत कैलासचा मृतदेह व दुचाकी मिळाली.
रात्री उशिर झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. आज बुधवारला पहाटे ४ वाजेपासून पुुन्हा शोधकार्य सुरू केले असता काकाच्या मृतदेहापासून दीड कि.मी. अंतरावर सकाळी ५.३० च्या सुमारास पुतण्या अमितचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी मर्ग दाखल करून शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. तपास किशोर झोटींग हे करीत आहेत.

Web Title: The death of masculine and immersion in the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.