जीएनटी कॉन्व्हेंटमध्ये सजावट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:33 AM2021-09-13T04:33:43+5:302021-09-13T04:33:43+5:30
भंडारा : स्थानिक जीएनटी कॉन्व्हेंट गणेशपुर भंडारा येथे गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती मेकिंग व मखर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ...
भंडारा : स्थानिक जीएनटी कॉन्व्हेंट गणेशपुर भंडारा येथे गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती मेकिंग व मखर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जी. एन. टिचकुले व कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. याप्रसंगी पार्थ गौतम, दिव्या गुर्वेकर, मानस चामट, सार्थक काळे, श्रुतिका कोटांगले, युक्ता कोटांगले, विशेष मरस्कोल्हे, तोषित पाटील, दिव्यानी कुंभारे, स्वरा भास्कर, निशांत डोणेकर, शर्वरी वाघमारे, गुर्मीत गोखले, अश्मी लांजेवार, सोनिया कुंभारे श्रेयस दिवटे, यजत खापेकर, प्रतीक रायपूरकर, अंशुल गजभिये, कनक अलोने, प्रतीक्षा रायपूरकर, निशिका साठवणे, सिद्धार्थ मडामे, यज्ञेश खापेकर इ. विद्यार्थ्यांनी स्वहस्ते मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती बनवल्या व विविध वस्तूंचा वापर करून सुंदर मखर तयार केले. संचालन सोनाली भेलावे यांनी, तर आभार प्रदर्शन रंजू सार्वे यांनी केले. कार्यक्रमाकरिता फाझेला शेख, योगीता वाडेकर, सरिता लाखडे, लीना मेश्राम, श्वेता खापेकर, लक्ष्मी मस्के, निलोफर ऊके, पल्लवी वानखेडे, पुष्पा डहारे, वासुदेव मदारकर मोनाली सेलोकर, प्रीती ब्राह्मणकर, हेमंतकुमार फटे, शारदा साखरे यांनी सहकार्य केले.