रोहयोची कामे तात्काळ सुरू करण्याचे निवेदन देताना भंडारा भाजपा ग्रामीणचे तालुका महांमत्री विष्णुदास हटवार, ठाणा येथील शिवाजी लेझिम ग्रुपच्या अध्यक्ष कल्याणी निखाडे, ज्येष्ठ नेते राजहंस वाडीभस्मे, शक्ती केंद्रप्रमुख रोशन ठवकर, शिक्षक सचिन तिरपुडे, तेजराम वाघमारे, प्रकाश गायधने, प्रशांत ढोमने, राजेश वाघमारे, रवी दिवटे, दिनेश देवगडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. दैनंदिन व्यवहार कसा करावा आणि रोजगारा अभावी वितभर पोटाची खळगी कशी भरावी, येणाऱ्या खरीप हंगामात शेतीची मशागत कशी करावी असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहे. शेतकामे आटोपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले असून रोजगार मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. संबंधित विभाग रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास विलंब होत असल्याने त्यांच्यामध्ये असंतोष पसरलाआहे. याबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन भंडारा तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी केली आहे.
रोहयोची कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:35 AM