जनजागृतीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

By admin | Published: February 19, 2017 12:21 AM2017-02-19T00:21:48+5:302017-02-19T00:21:48+5:30

रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन राबवित असलेल्या हागणदारीमुक्तीचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे.

Despite the public awareness, the situation was 'like' | जनजागृतीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

जनजागृतीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

Next

हागणदारीमुक्तीचा फज्जा : अंमलबजावणी पुढाकाराची गरज
संजय साठवणे साकोली
ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन राबवित असलेल्या हागणदारीमुक्तीचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. हागणदारीमुक्त गाव होऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शासनाने 'हागणदारीमुक्त ग्रामपंचायत' योजना सुरू केलीे आहे; मात्र अनेक निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या परिसरातच घाण करणे सर्रास सुरू असल्याने हगणदरीमुक्तीचा सर्वत्र फज्जा उडाला आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावागावातील रस्त्याच्या दोन्ही कडा घाणीने रंगलेल्या दिसत असून, हागणदारीमुक्त झालेली अनेक गावे पुन्हा हागणदारीयुक्त झाल्याने या अभियानाचा उद्देशच संपला आहे. शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याने याची चौकशी करण्याची गरज आहे.
गावाबाहेर शौचास बसण्यास कायद्याने बंदी आहे; मात्र हागणदारीमुक्तीची ग्रामसभा, दवंडीच्या माध्यमातून आरोग्यास होणारे फायदे व आपले गाव स्वच्छ राखण्याकरिता योग्य उपाययोजनांच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासन स्तरावरून निधी उपलब्ध होत असल्यावरही सर्वत्र गावांच्या चारही बाजूने घाण दिसून येत आहे. या घाणीमुळे उदभवणाऱ्या अनेक आजारांचे थैमान असतानाही पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या संबंधित आरोग्य विभागाकडून गंभीर दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे ही बाब विकासास मोठी अडसर ठरत आहे. गावाबाहेर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शासन गाव तेथे घर व घर तेथे शौचालयसाठी अनुदान उपलब्ध करून देत असताना ही विदारक स्थिती कशी, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. दरवर्षी शासन योजना राबविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध करून देते; मात्र एवढा निधी खर्च करूनसुद्धा ही योजना प्रभावीरीत्या राबवली जात नसल्याचे दिसून येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व ग्रामस्वच्छतेसाठी, योजना जन जागृतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

Web Title: Despite the public awareness, the situation was 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.