गोवर्धन नगरातील एका प्रभागात रिकाम्या भूखंडावर परिसरातील नागरिक आपल्या घरचा कचरा फेकत आहेत. त्यामुळे भूखंडाजवळील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू व मलेरिया यासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात नगर परिषदेने नेहमीच घंटागाडी पाठवावी, अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
या परिसरातील नाल्यासुद्धा तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने किमान पावसाळ्यात नाल्यांची स्वच्छता करण्याची गरज आहे. रिकाम्या भूखंडावरील कचऱ्याची विल्हेवाट नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ करावी, अशी मागणी येथील परिसरातील नागरिकांनी केली आहे.