जि. प. निवडणूक आघाडीचा निर्णय योग्यवेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 05:00 AM2021-02-27T05:00:00+5:302021-02-27T05:00:28+5:30
भंडारा दौऱ्यावर खासदार पटेल आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले. निकालावर आम्ही समाधानी आहो, असे सांगितले. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यातील धान भरडाईचा तिढा सोडविण्यात यश आले आहे. त्यामुळे धानाची पूर्ण क्षमतेने भरडाई होईल, आणि गोदामांची समस्याही सुटेल, असे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. आताच यावर बोलणे योग्य नाही. प्रत्येक पक्षाने निवडणुकीची तयारी ठेवलीच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसही या निवडणुकीसाठी संपूर्ण तयारीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी येथे केले.
भंडारा दौऱ्यावर खासदार पटेल आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले. निकालावर आम्ही समाधानी आहो, असे सांगितले. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यातील धान भरडाईचा तिढा सोडविण्यात यश आले आहे. त्यामुळे धानाची पूर्ण क्षमतेने भरडाई होईल, आणि गोदामांची समस्याही सुटेल, असे त्यांनी सांगितले. धानाला ७०० रुपये बोनस देण्यात आला तेव्हापासून संपूर्ण धान केंद्रावर विक्रीसाठी येत आहे. धानाला २५६८ रुपये भाव मिळतो. धानाची विक्रमी खरेदी होत आहे. गोदामांची संख्याही हळूहळू वाढणार असल्याचे ते म्हणाले. शेतकरी, व्यापारी आणि मिलर्स यांच्या समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू कारेमोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार, धनंजय दलाल आदी उपस्थित होते.