जिल्ह्याला मिळाले आणखी १५ हजार ८०० डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:50+5:302021-04-15T04:33:50+5:30
१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला ...
१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मात्र लसींचा पुरवठा कमी होत असल्याचे जाणवत आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या लसींचा आता मोजकाच साठा येत असून १-२ दिवसांतच तो संपत असल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची स्थिती निर्माण होते. असाच प्रकार सोमवारी घडला होता.
जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी जिल्ह्याला ९९२० कोव्हॅक्सिन लसींच्या डोसेसचा पुरवठा करण्यात आला. या साठ्यातून शनिवारी, रविवारी व सोमवारी लसीकरण करण्यात आल्यानंतर सोमवारी साठा पूर्णपणे संपला होता. अशात मंगळवारी लसीकरणाला ब्रेक लावावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली होती.
एकीकडे शासनाकडून लसीकरणावर जोर दिला जात असतानाच दुसरीकडे लस नसल्याने लसीकरणात खंड पडण्याची पाळी आली होती. मात्र सोमवारी सायंकाळी जिल्ह्याला कोविशिल्डचे १५,८०० डोस मिळाले आहेत. त्यामुळे आता आणखी काही दिवसांचा प्रश्न सुटला आहे.