आॅनलाईन लोकमततुमसर : पाणी हे जीवन आहे, त्यात तुमसर शहराला जलपुर्ती करणारी देव्हाडी मार्गावरील मुख्य वाहिणी फुटलेली असुन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्या पाण्याचा उपयोग शेतकरी खरीप पिकासाठी करीत आहेत. यावर्षीचा संभाव्य दुष्काळी स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.तुमसर शहराला पाणी पुरवठा करणारी देव्हाडी मार्गावरील मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचलेले आहे. तुमसर शहराला माडगी येथील वैनगंगेच्या पात्रातुन पाणी पुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी आहे. देव्हाडी मार्गावरील शाळेपासून ते बांगळकर यांच्या घरापर्यंत ही जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. त्या रस्त्यादरम्यान ३०० मीटरच्या मार्गावर रस्त्याच्या डाव्या कडेला पाणी साचलेले आहे.तुमसर नगर परिषदेच्या शतकोत्तर सवर्ण महोत्सव कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहराला पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी निधी देण्याची घोषणा केली. दुसरीकडे नगर परिषदेच्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होत आहे. फुटलेल्या या जलवाहिनीतून नागरीकांना अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. ही जलवाहिनी अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. उन्हाळा तोंडावर आलेला आहे. अशातच लाखो लिटर पाणी वाया जाण्यामुळे नागरीकांना जलसंकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर निखाडे यांनी केली आहे.जलवाहिणी फुटलेली असल्याची माहिती आपल्याला अद्याप नाही. मी सुटीवर असल्यामुळे त्यासंदर्भात बोलणे योग्य होणार नाही- अर्चना मेंढे, मुख्याधिकारी,नगर परिषद तुमसर.
पिण्याचे पाणी शेतीकरिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 10:28 PM
पाणी हे जीवन आहे, त्यात तुमसर शहराला जलपुर्ती करणारी देव्हाडी मार्गावरील मुख्य वाहिणी फुटलेली असुन लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : तुमसर नगरपरिषदेचे समस्यांकडे दुर्लक्ष