नाल्यांअभावी शेतशिवार जलमय, तर घरादारांत शिरतेय पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:35+5:302021-08-23T04:37:35+5:30
याबाबत मोहाडीचे उपविभागीय अभियंता शुक्ला म्हणाले, नाली बांधकामासाठी कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे नाइलाज आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी पर्यायी व्यवस्था ...
याबाबत मोहाडीचे उपविभागीय अभियंता शुक्ला म्हणाले, नाली बांधकामासाठी कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे नाइलाज आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी पर्यायी व्यवस्था करावी. प्रकरणी शेतकरी, ग्रामस्थांत असंतोष आहे. त्वरित कान्हळगाव, खडकी येथे गावाच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाल्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी आहे. कान्हळगाव येथे गावातून बोरीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी दुसऱ्या बाजूला निघण्यासाठी मोरीचे बांधकाम होणे गरजेचे आहे.'
कोट -
रस्त्याचे बांधकाम करताना शिवालय कंपनी व सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांच्या नियोजनशून्य कारभाराचा आम्हाला त्रास होत आहे. कान्हळगाव व खडकी येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांचे व मोऱ्यांचे बांधकाम होणे गरजेचे होते. परंतु, तसे न झाल्याने आज शेतशिवारात पिकांची लागवड करणे गैरसोयीचे ठरत आहे. गावात पाणी साचून राहत असल्याने अस्वच्छता पसरत आहे.
- दिगांबर कुकडे, सरपंच कान्हळगाव,
220821\img_20210822_114921_1.jpg
नाल्याचे बांधकाम न झालेला मुंढरी ते खडकी रस्ता फोटो