कोरंभी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:24+5:302021-08-23T04:37:24+5:30
प्रसूतीसाठी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्याअभावी वेळेत पोहचता येत नाही. आजारी व्यक्तीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. काम ...
प्रसूतीसाठी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्याअभावी वेळेत पोहचता येत नाही. आजारी व्यक्तीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. काम लवकर व्हावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आयुध निर्माणी प्रशासनाने लक्ष देत रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
शहापूरचा, खरबीचा सर्विस रोड धोकादायक
भंडारा तालुक्यातील शहापूर येथील सर्विस रोड पूर्णच खचला असून येथे रस्त्यावर खड्डे पडले असतानाही दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय, असा संतप्त सवाल शिवसेना पदाधिकारी यांनी केला आहे. खरबी नाका येथील सर्विस रस्ताही खड्ड्यात गेल्याने अनेकांना दुखापत झाली आहे. याकडे प्रशासनाचे अनेक दिवसापासून दुर्लक्ष होत आहे. अनेकदा ट्रकचालक महामार्गावरील मुजबी, ठाणा, खरबी (नाका) येथे सर्विस रोडवरच वाहने उभी करतात. महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करून शहापूर येथील सर्विस रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख संजय आकरे यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अनिल गायधने, शहापूरचे नरेश लांजेवार, मोरेश्वर हटवार, नीलेश मोथरकर, अमोल जौंजाळ, सुनील सोमनाथे आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बाॅक्स
बळीराजा अनेक वर्षापासून त्रस्त
कोरंबी परिसरातील अनेक शेतकरी या रस्त्याने ये जा करतात. त्यांना अनेकदा भंडारा शहरात विविध कामांसाठी याच रस्त्याने यावे लागते. परंतु खड्डेमय रस्त्यांवरुन खते, बियाणे, शेती अवजारे नेताना खरीप हंगामात शेतकरी पुरते मेटाकुटीला आले आहेत. आयुध निर्माणी प्रशासन बळीराजाचा जीव जाण्याचा वाट पाहत आहे काय असा प्रश्न परिसरातील शेतकरी, शेतमजूर महिला विचारत आहेत. गणेशपूर येथूनही अनेक महिला शेतीकामांसाठी याच रस्त्याने प्रवास करतात. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कोट
भंडारा नागपूर महामार्गावरील मुजबी, ठाणा, खरबी (नाका) येथे सर्विस रोडवरच वाहने उभी असतात. यामुळे स्थानिक वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परिसरात अनेक अपघाताच्या घटना घडल्यावरही या सर्विस रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांवरच उभ्या होणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. मात्र महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
संजय आकरे,
उपसरपंच,खरबी (नाका)