परप्रांतीयांचा सीमावर्ती भागातून सहज प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:24+5:302021-01-08T05:54:24+5:30
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी हे व्यापारी केंद्र असून, या गावाच्या सीमा नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्याला लागून आहेत. मध्य प्रदेशातील सामाजिक तत्त्व ...
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी हे व्यापारी केंद्र असून, या गावाच्या सीमा नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्याला लागून आहेत. मध्य प्रदेशातील सामाजिक तत्त्व राज्याच्या सीमाभागात सहज प्रवेश करतात. परिसरात अपघात करून मध्य प्रदेशच्या सीमेवर पळून जातात. काही वर्षांपूर्वी चिखला मॅगनिज खाणीतून बारुद व डिटोनेटर चोरीला गेले होते. त्याचा आजपर्यंत सुगावा लागला नाही. लेंडेझरी रामटेक पवनी मनसर, कांद्री देवलापार हा रस्ता नागपूर जिल्ह्यात जातो. त्यामुळे या मार्गाने रेती व पशुची तस्करी केली जाते. सरळ व चोरटा मार्ग असल्याने असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. या प्रकारावर आळा घालण्याकरिता नाकाडोंगरी व लेंडेझरी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी निर्माण करण्याची गरज आहे.