लग्नसराईत बसणार आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:47 PM2019-04-01T21:47:23+5:302019-04-01T21:47:46+5:30

लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झाली असून याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे आता डोकेदुखी ठरणार आहे. यासाठी वर-वधू पित्यासह कुटुंबीयांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.

The election code of conduct will be settled in the marriage season | लग्नसराईत बसणार आचारसंहितेचा फटका

लग्नसराईत बसणार आचारसंहितेचा फटका

Next
ठळक मुद्देपोलिसांची करडी नजर : वर-वधू पित्यांना होऊ शकतो मनस्ताप

शिवशंकर बावनकुळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झाली असून याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे आता डोकेदुखी ठरणार आहे. यासाठी वर-वधू पित्यासह कुटुंबीयांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रभार भंग होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पथके तैनात केली असून त्यांच्या मार्फत वाहनांची तपासणी होत आहे.
आचारसंहितेनुसार ३० हजारांहून अधिक रक्कम सोबत बाळगल्यास त्याबाबतची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी विचारणा केली तर योग्य कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. मात्र कागदपत्रे नसल्यास त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. योग्य कागदपत्रे नसल्यास रक्कम जमा करण्यात येणार आहे. लग्न सराईचा महिना असून शेतकरी नोकरीवर्ग मुलामुलींचे लग्न करण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक नागरिक शहरात खरेदीसाठी येताना जवळ मोठ्या प्रमाणात रक्कम आणतात. त्यांनाही फटका बसणार आहे.
लग्नात राजकीय नेते उपस्थित राहतील तर खबरदारी घ्यावी लागणार आहे. लग्नासाठी सोने, कपडे, भांडी खरेदीसाठी मोठी रक्कम सोबत घ्यावी लागते. यावेळी आगामी दोन महिने अशी रक्कम बाळगताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. अधिक रक्कम असल्यास बँकेतून काढल्याची पावती सोबत ठेवावी लागणार आहे. सामान्य लग्नाबाबत परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
या निवडणुकीच्या हंगामात वर-वधूपित्यांना मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून चौकशी सुरु आहे. रोख रकमेबाबत मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
एप्रिल-मे महिन्यात १२ मुहूर्त
एप्रिल व मे महिन्यात एकाच वेळी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि लग्न सराईची झुंबड उडणार आहे. दोन महिन्यात १२ विवाह मुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये १७, १८, २२, २४, २६, २७ व २८ तर मे महिन्यातसुद्धा काही विवाह मुहूर्त आहेत.
महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्यांना फटका
महाराष्ट्रातून परराज्यात ये जा करणारे नागरिक व्यवसायीकांना त्रास सहन करावा लागणार आहे. परिराज्यातील व्यापाºयांच्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. खरेदीसाठी सोबत असलेल्या पैशांबाबत योग्य कागदपत्रे व्यवसायीकांनी सोबत बाळगावी किंवा प्रशासनानी मागितल्यास सादर करावे लागतील.

Web Title: The election code of conduct will be settled in the marriage season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.