समता सप्ताहानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:45+5:302021-04-15T04:33:45+5:30

निंबा : राज्य शासन व स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था समतादूत प्रकल्पाद्वारे डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर ...

Equality Weekly Online Guide | समता सप्ताहानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन

समता सप्ताहानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन

Next

निंबा : राज्य शासन व स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था समतादूत प्रकल्पाद्वारे डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ‘डॉ. आंबेडकर यांचे कृषी सिंचन विषयक धोरण’ यावर ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रम सोमवारी (दि. १२) घेण्यात आला.

मुख्य मार्गदर्शक म्हणून पवन पाथोडे, तर अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून साजन वासनिक, महेंद्र कटबरीये, करुणा मेश्राम, शारदा कळसकर, संदेश उके, राजरत्न मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी पाथोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नसून, एक विचार व एक चळवळ आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.

आंबेडकरांनी शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनेक चळवळी केल्या, विधिमंडळावर मोर्चे नेले व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी दामोदर नदी प्राधिकरण स्थापन केले, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन समतादूत मुनेश रहांगडाले व मनिष बिजेवार यांनी केले होते.

समता सप्ताहाचे आयोजन बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये व सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: Equality Weekly Online Guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.