हृदयरोग, अलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायलाच हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 05:00 AM2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:00:57+5:30
मधुमेह असलेली व्यक्ती, हृदयविकार असलेली व्यक्ती, हृदयरोगाची शसक्रिया झालेली, ॲन्जिओप्लास्टी करण्यात आलेली व्यक्तीही कोरोना लस घेऊ शकतात. ही लस सुरक्षित असून, त्याचा दुष्परिणाम हा अतिशय कमी आहे. कोरोना या जीवघेण्या विषाणूपासून वाचविण्याकरिता ही लस उपयोगी ठरणारी आहे. कोरोना झाला तरी त्याची मारक क्षमता अतिशय कमी होते.
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालयातूनही कोरोनाचे लसीकरण केले जात आहे. यापूर्वी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, फ्रन्टलाइन वॉरियर आणि आता ज्येष्ठ नागरिक व जोखमीचे आजार असणान्यांनाही कोरोनाची लस दिली जात आहे. ही लस हृदयरोग, अॅलर्जी, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनाही घेणे आवश्यक आहे. काही अपवादात्मक स्थितीतच लस घेता येत नाही. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे.
मधुमेह असलेली व्यक्ती, हृदयविकार असलेली व्यक्ती, हृदयरोगाची शसक्रिया झालेली, ॲन्जिओप्लास्टी करण्यात आलेली व्यक्तीही कोरोना लस घेऊ शकतात. ही लस सुरक्षित असून, त्याचा दुष्परिणाम हा अतिशय कमी आहे. कोरोना या जीवघेण्या विषाणूपासून वाचविण्याकरिता ही लस उपयोगी ठरणारी आहे. कोरोना झाला तरी त्याची मारक क्षमता अतिशय कमी होते. कोरोनाची लस घेतल्याने फार गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम होतात हा पूर्णत गैरसमज आहे. देशपातळीवर लसीकरण सुरू असून, अशा स्वरूपाची एकही तक्रार पुढे आलेली नाही. भंडारा जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतीसाद लाभत आहे.
काय म्हणतात वैद्यकीय तज्ज्ञ...
हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार असलेल्या व्यक्तीने ही लस आवर्जून घ्यावी. फक्त प्लेटलेट कमी, रक्तस्राव होण्याचा व्रास असलेल्यांनी लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना पहिल्या डोजपासून अपिरमित रिॲक्शन झालेे असेल, गर्भवती महिला, किंवा वॅक्सीन घेतल्यानंतर ज्यांना त्रास व रिॲक्शन होत असेल त्यांनी ही लस घेऊ नये. कोर।ना झालेल्या व्यकतीने महिनाभरानंतर ही व्हॅक्सीन घ्यावी. याशिवाय कुठलीही व्यक्ती ही लस घेऊ शकते.-
डॉ. मनोज चव्हाण, हृदयरोग विशेषज्ञ भंडारा.
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इतर सर्व व्यक्तींनी ही लस आवर्जून घ्यावी. ती पूर्णतः सुरक्षित आहे. एचआयव्ही व गरोदर माता लहान मुलांना लस देण्यावर संशोधन सुरू आहे.
- डॉ. निखिल डोकरीमारे
आरएमओ, बाह्यविभाग, जिल्हा रूग्णा.
कोरोना लस सुरक्षित आहे.
कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी ही लस घेणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे.
- डॉ. नितीन तुरस्कर,
अध्यक्ष, आयएमए, भंडारा.
थंडी-ताप आला तरी घाबरू नये...
कोरोनाची लस घेतल्यानंतर सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळतात. कोणाला अशक्तपणा येतो, झोप घ्यावीशी वाटते, हलकासा ताप येतो, थंडी वाजू शकते, इंजेक्शन घेतलेली जागा दुखू शकते ही सर्व लक्षणे जाणवत असल्यास कुठलाही धोका नाही. यामुळे घाबरण्याचे कारण नाही.