शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
2
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
3
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
4
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
5
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
6
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
7
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
8
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
9
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
10
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
11
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
12
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
13
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
14
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
15
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
16
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
17
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
18
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
19
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
20
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला

हृदयरोग, अलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 5:00 AM

मधुमेह असलेली व्यक्ती, हृदयविकार  असलेली व्यक्ती,  हृदयरोगाची शसक्रिया झालेली, ॲन्जिओप्लास्टी करण्यात आलेली व्यक्तीही कोरोना लस घेऊ शकतात. ही लस सुरक्षित असून, त्याचा दुष्परिणाम हा अतिशय कमी आहे. कोरोना या  जीवघेण्या विषाणूपासून वाचविण्याकरिता ही लस उपयोगी ठरणारी आहे. कोरोना झाला तरी त्याची मारक क्षमता अतिशय कमी होते.

ठळक मुद्देकोणताही अडथळा नाही : तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यातील  शासकीयसह  खासगी रुग्णालयातूनही कोरोनाचे लसीकरण केले जात आहे. यापूर्वी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, फ्रन्टलाइन वॉरियर आणि आता ज्येष्ठ नागरिक व जोखमीचे आजार असणान्यांनाही कोरोनाची लस दिली जात आहे. ही लस हृदयरोग, अॅलर्जी, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनाही घेणे आवश्यक आहे. काही अपवादात्मक स्थितीतच लस घेता येत नाही. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे.मधुमेह असलेली व्यक्ती, हृदयविकार  असलेली व्यक्ती,  हृदयरोगाची शसक्रिया झालेली, ॲन्जिओप्लास्टी करण्यात आलेली व्यक्तीही कोरोना लस घेऊ शकतात. ही लस सुरक्षित असून, त्याचा दुष्परिणाम हा अतिशय कमी आहे. कोरोना या  जीवघेण्या विषाणूपासून वाचविण्याकरिता ही लस उपयोगी ठरणारी आहे. कोरोना झाला तरी त्याची मारक क्षमता अतिशय कमी होते.  कोरोनाची लस घेतल्याने फार गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम होतात हा पूर्णत गैरसमज आहे. देशपातळीवर लसीकरण सुरू असून, अशा स्वरूपाची एकही तक्रार पुढे आलेली नाही. भंडारा जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतीसाद लाभत आहे.  

काय म्हणतात वैद्यकीय तज्ज्ञ...

हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार असलेल्या व्यक्तीने ही लस आवर्जून घ्यावी. फक्त प्लेटलेट कमी, रक्तस्राव होण्याचा व्रास असलेल्यांनी लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना पहिल्या डोजपासून अपिरमित रिॲक्शन झालेे असेल, गर्भवती महिला, किंवा वॅक्सीन घेतल्यानंतर ज्यांना त्रास व रिॲक्शन होत असेल त्यांनी ही लस घेऊ नये. कोर।ना झालेल्या व्यकतीने महिनाभरानंतर ही व्हॅक्सीन घ्यावी. याशिवाय कुठलीही व्यक्ती ही लस घेऊ शकते.- डॉ. मनोज चव्हाण, हृदयरोग विशेषज्ञ भंडारा.

 

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इतर सर्व व्यक्तींनी ही लस आवर्जून घ्यावी. ती पूर्णतः सुरक्षित आहे. एचआयव्ही व गरोदर माता लहान मुलांना लस देण्यावर संशोधन सुरू आहे.- डॉ. निखिल डोकरीमारे आरएमओ, बाह्यविभाग, जिल्हा रूग्णा.

कोरोना लस सुरक्षित आहे.कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी ही लस घेणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे. - डॉ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष, आयएमए, भंडारा.

थंडी-ताप आला तरी घाबरू नये...

कोरोनाची लस घेतल्यानंतर सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळतात. कोणाला अशक्तपणा येतो, झोप घ्यावीशी वाटते, हलकासा ताप येतो, थंडी वाजू शकते, इंजेक्शन घेतलेली जागा दुखू शकते ही सर्व लक्षणे जाणवत असल्यास कुठलाही धोका नाही. यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस