लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण राज्यात दर्जेदार तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षापासून सर्वसाधारण वाणाच्या (जाड) धान लागवडीकडे वळला असून यंदाही सर्वाधिक लागवड सर्वसाधारण धानाची होण्याचे संकेत आहे. कमी कालावधीत येणारे उत्पन्न आणि उच्च प्रतीच्या व सर्वसाधारण प्रतीच्या धानाच्या किमतीत अत्यल्प तफावत असल्याने शेतकरी सर्वसाधारण प्रतीचाच धान लावत आहे. केवळ घरी खाण्यापुरताच उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली जात आहे. कृषी केंद्रातही सर्वसाधारण ग्रेडच्या बियाण्यालाच शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. तब्बल एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तीन वर्षापूर्वी उच्च प्रतीचा धान लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता. केशर, चिन्नोर यासह नामवंत तांदूळ येथे पिकविला जायचा. भंडाराच्या तांदळाला विदर्भातच नव्हे तर संपूर्ण देशात मागणी होती. अत्यंत बारीक आणि खाण्यास मऊ अशी या तांदळाची ओळख आहे. मात्र गत तीन वर्षांपासून शेतकऱ्यांनी सर्वसाधारण प्रतीचा धान लागवडीस प्रारंभ केला. उच्च प्रतीचा धानाला आधारभूत केंद्रावर योग्य भाव मिळत नाही. खासगी व्यापाऱ्यांना तांदूळ विकावा तर योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सहा - सहा महिने शेतकऱ्यांच्या घरी तांदूळ पडून राहत होता. दुसरीकडे गत काही वर्षात आधारभूत केंद्रावर धान विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अ ग्रेडच्या धानाची आधारभूत किंमत १८३५ आणि सर्वसाधारण धानाची आधारभूत किंमत १८१५ रुपये आहे. अत्यल्प तफावतीने शेतकरी आता सर्वसाधारण धान पेरण्याकडे वळला आहे. अनेकदा तर आधारभूत खरेदी केंद्रावर उच्च प्रतीचा धानही सर्वसाधारण धान म्हणूनच विकला जातो. यासोबतच बोनसमुळेही शेतकरी सर्वसाधारण धानाची लागवड करीत आहे. शेतकºयांचा कल संकरित वाणाच्या वियाण्यांकडे असून सध्या कृषी केंद्रांमध्ये खरेदीसाठी धावपळ सूर झाली आहे.कमी पाणी आणि अल्पकाळात उत्पन्नसर्वसाधारण धान हा १०० ते १२० दिवसात येतो. तसेच या धानाला पाणीही कमी लागते. रोगालाही सहनशील आहे. उलट उच्च प्रतीचा धान १४५ ते १५० दिवसात येतो. रोगालाही लवकर बळी पडतो आणि पाणीही जास्त लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वसाधारण धानालाच पसंती दिली आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण धानानंतर रबी हंगामातील पिकांचे नियोजनही शेतकऱ्यांना करणे सोयीचे जाते. बियााण्यांचे दरही उच्च प्रतीपेक्षा कमी आहे. महाबिज पुरस्कृत कंपन्यांचे धान बियाणे शेतकºयांना सहज उपलब्ध होत आहे.जिल्ह्यात अलीकडे १०० ते १२० दिवसात येणाऱ्या वाणाची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. याचा फायदा रबी पिकांच्या उत्पादन वाढीत होत आहे. शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. बियाणे आणि खतांची जिल्ह्यात तुर्तास कोणतीही टंचाई नाही.-हिंदूराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक भंडाराजाड धानाचा वाण मध्यम कालावधीत येतो. त्यामुळे शेतकरी या वाणाला सर्वाधिक पसंती देत आहेत. नाममात्र शेतकरी घरी खाण्यापुरते अर्धा ते एक एकर उच्च प्रतीचा धान पेरतात.-प्रशांत जांभुळकर, कृषी केंद्र चालक
यंदाही सर्वसाधारण धानाच्या वाणालाच पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 5:00 AM
भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. तब्बल एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तीन वर्षापूर्वी उच्च प्रतीचा धान लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता. केशर, चिन्नोर यासह नामवंत तांदूळ येथे पिकविला जायचा. भंडाराच्या तांदळाला विदर्भातच नव्हे तर संपूर्ण देशात मागणी होती. अत्यंत बारीक आणि खाण्यास मऊ अशी या तांदळाची ओळख आहे.
ठळक मुद्देबियाण्यांची चाचपणी : कमी कालावधी आणि दरातील अल्प तफावतीने पसंती