बैठे पथकांच्या निगराणीत होणार परीक्षा

By admin | Published: February 19, 2017 12:19 AM2017-02-19T00:19:40+5:302017-02-19T00:19:40+5:30

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी ५८ केंद्रावर एकूण २० हजार ४९९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

Examinations will be held in the supervision of sitting squads | बैठे पथकांच्या निगराणीत होणार परीक्षा

बैठे पथकांच्या निगराणीत होणार परीक्षा

Next

२८ पासून परीक्षा : दहावीचे २१,१७४ तर बारावीचे २०,४९९ विद्यार्थी देणार परीक्षा
इंद्रपाल कटकवार भंडारा
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी ५८ केंद्रावर एकूण २० हजार ४९९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे दक्षता समिती ऐवजी बैठे पथकांच्या निगराणीत १० वी व १२ वीच्या परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रात निधी अभावी व्हीडिओ चित्रिकरण करण्यात येणार नसल्याची माहिती आहे. भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे पथक परीक्षेदरम्यान केंद्रांवर होणाऱ्या कॉपी व अनुचित प्रकारावर करडीनजर ठेवणार आहेत.
विभागिय शिक्षण मंडळाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभाग बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा बारावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तथा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार थांबविण्यासाठी बैठे पथकासह पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरपर्यत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रात संचालित झेराक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आहे. भरारी पथकात शिक्षणाधिकारी, महसूल विभागाचे प्रमुख, संबंधित तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश राहणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. परिक्षेच्या तयारीसंदर्भात शनिवारी अप्पर जिल्हाधिकी डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात भयमुक्त वातावरणात इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा घेण्यासंदर्भात संबंधीत यंत्रणेला दिशानिर्देश देण्यात आले.

दहावीचे एकूण ८८ केंद्र
दहावीची परिक्षा ७ मार्चपासून एकूण ८८ केंद्रांवर होत आहे. यावर्षी २१,१७४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात नियमित तथा पुनर्परीक्षार्थीचा समावेश आहे. तालुकानिहाय मध्ये भंडारा १६, तुमसर २२, साकोली ११, लाखनी ११, पवनी १०, लाखांदूर ९ व मोहाडी तालुक्यात ९ परीक्षा केंद्र आहेत.

संवेदनशील केंद्र नाही
भंडारा जिल्ह्यातील कॉपी बहाद्दरांचा रिकॉर्ड पाहता बोर्डातर्फे अशा परिक्षा केंद्रांचा समावेश संवेदनशिल केंद्रात करण्यात येत होता. मात्र यावर्षी शिक्षण मंडळाने कोणतेही केंद्र संवेदनशिल नाही, असे सांगितले. म्हणजेच प्रत्येक केंद्रावर चोख बंदोबस्त ठेऊन कॉपी होणार नाही, याची पुर्वसुचना दिल्याचे म्हटले जात आहे. कॉपी बहाद्दरांचा कलंक पुसण्यासाठी ही धडपड आहे.

Web Title: Examinations will be held in the supervision of sitting squads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.