रब्बी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:49+5:302021-07-28T04:36:49+5:30
रब्बी धान खरेदी बारदान, गोदामाच्या समस्येने रखडली होती. नोंदणी करून शेतकऱ्यांचा धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे एकदा नव्हे, ...
रब्बी धान खरेदी बारदान, गोदामाच्या समस्येने रखडली होती. नोंदणी करून शेतकऱ्यांचा धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे एकदा नव्हे, दोनदा मुदतवाढ देऊनही खरेदी पूर्ण झाली नाही. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. मुदतवाढीची मागणी करण्यात आली. त्यावरून आता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पालांदूर येथील सेवा सहकारी संस्थेअंतर्गत आधारभूत केंद्रावर ९ जून ते २२ जुलैपर्यंत ७३४ शेतकऱ्यांची धान खरेदी आटोपलेली आहे. २९ हजार ९७२ क्विंटल धानाची मोजणी केली आहे. मात्र खरेदी केलेल्या धानाची रक्कम ५ कोटी ५९ लाख ८७ हजार ६९६ रुपये शिल्लक आहे. खरिपाचा बोनस २०९६ शेतकऱ्यांचा निम्मा बोनस अद्यापही मिळाला नाही.
कोट
सेवा सहकारी संस्थेअंतर्गत नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांची धानाची मोजणी पारदर्शक पद्धतीत आटोपलेली आहे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेतलेली होती. शासन व प्रशासनाने धानाची रक्कम व उरलेला बोनस लवकरात लवकर द्यावा. जेणेकरून चालू खरीप हंगाम कसायला मोठी मदत होईल.
विजय कापसे
अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर