बाॅक्स
संपूर्ण धानाची खरेदी हाेणार
दरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामात धानाचे उत्पन्न माेठ्या प्रमाणात झाले. गाेदामाअभावी धान खरेदी उशिराने सुरू झाली. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. पाच लाख क्विंटल अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात असून आता एक महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने संपूर्ण धानाची खरेदी हाेणार आहे.
बाॅक्स
मुदतवाढीचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा - सुनील मेंढे
धान खरेदीचा कालावधी संपल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे. एक महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे. खासदार सुनील मेंढे यांनी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला हाेता. या पाठपुराव्याला यश आले असून आता शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. शेतकऱ्यांनी वाढलेल्या मुदतीचा फायदा घेऊन आपल्याकडील धानाची विक्री करावी, असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.