मंत्राच्या ताफ्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सामिष भाेजनावर ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:33 AM2021-01-13T05:33:17+5:302021-01-13T05:33:17+5:30
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे १० चिमुकल्यांचा हाेरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह डझनावर मंत्री भंडाऱ्यात आले. रुग्णालयाची ...
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे १० चिमुकल्यांचा हाेरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह डझनावर मंत्री भंडाऱ्यात आले. रुग्णालयाची पाहणी केली. बाळ दगावलेल्या कुटुंबांचे सांत्वन केले. गांभीर्याने या घटनेची पाहणी करुन प्रशासनाला सूचना केल्या मात्र शनिवारी आलेल्या मंत्राच्या ताफ्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चक्क सामिष भाेजनावर ताव मारला. गावराणी काेंबडे, मासे आणि झिंग्याची ही पार्टी हाेती. या पार्टीचे व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल हाेताच एकच खळबळ उडाली. दहा बालकांचा बळी गेल्यानंतर मंत्र्याच्या ताफ्यातील अधिकारी व कर्मचारी एवढे असंवेदनशील असू शकतात काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मंत्र्याच्या मागेपुढे असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी केलेला हा प्रकार त्या निरागश चिमुकल्यांच्याप्रति असलेल्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय देत आहे. आता ही जेवणाची व्यवस्था कुणी केली. जेवण विश्रामगृहावर तयार झाले की, बाहेरुन आणले. हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे.