लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रिक्षाचालक असाे की धनाढ्य व्यापारी, प्रत्येकजणच कुठल्या न कुठल्या स्वरूपात सरकारला टॅक्स देत असताे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही सरकारला टॅक्स अदा करीत असते. मात्र, त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. काेराेना संघर्ष काळात पाेट भरण्याचीच मारामार असतानाही आपण टॅक्स का भरावा, असा अनेकांना सवालही उपस्थित झाला. मात्र, ताे लहान सहान बाबीतून शासनाला कर देत असताे. याची त्याला कल्पनाही नसते. कामगार, चालक, भाजीपाला विक्रेता, फेरीवाला, सिक्युरिटी गार्ड, घरकाम करणाऱ्या महिलाही कुठल्या न कुठल्या स्वरूपात शासनाला टॅक्स देत असतात. मग ते किरकाेळ बाजारातील दुकान असाे की घरटॅक्स.
आपण भरता का टॅक्स
ऑटाेचालक : राेड टॅक्स व दैनंदिन पेट्राेलच्या माध्यमातून शासनाला टॅक्स देत असताे. याशिवाय अन्य बाबींचा तर हिशेबच लागत नाही.
वाहनचालक : कधी इंधनाच्या करापाेटी, तर कधी टाेलनाक्यावर टॅक्स द्यावा लागताे.
भाजीपाला विक्रेता : बाजारात दुकान लावण्यासाठी पालिका किंवा ग्रामपंचायत छाेट्या दरात का असेना कर आकारणी करीत असते. हा कर द्यावाच लागताे.
सिक्युरिटी गार्ड : पगार अत्यल्प असला तरी कुठल्यातरी माध्यमातून टॅक्स भरीत असताे. यात घरटॅक्स, वीज बिल, पाणीपट्टी कर आदींचा समावेश हाेत असताे.
फेरीवाला : जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात अनेक फेरीवाले दुकान लावीत असतात. यात माेबाईल फेरीवाल्यांची संख्या अधिक असते. त्यांच्याकडूनही स्थानिक प्रशासन कर घेत असते. यामूधनच माेठा कर प्राप्त हाेताे.
सलून चालक : प्रत्येक सलून चालकाचे स्वत:चे दुकान नसते. याशिवाय घरभाडे किंवा अन्य बाबींसाठीही टॅक्स द्यावा लागतो.
कामगार : स्थानिक पातळीवर शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी नियमितपणे टॅक्स भरीत असताे.