शेतातील खाेदकामावरुन दाेन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:36 AM2021-01-23T04:36:07+5:302021-01-23T04:36:07+5:30
भंडारा : शेतातील कालव्याचे सपाटीकरण व उंचीकरणासाठी केलेल्या खाेदकामावरुन दाेन गटात तुंबळ हाणामारी हाेण्याची घटना भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे ...
भंडारा : शेतातील कालव्याचे सपाटीकरण व उंचीकरणासाठी केलेल्या खाेदकामावरुन दाेन गटात तुंबळ हाणामारी हाेण्याची घटना भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी दाेन्ही गटातील सातजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये एका पाेलीस हवालदाराचा समावेश आहे. निरंजन दमळू मुस्कारे (रा. राजेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते गावातून जाणाऱ्या कालव्याचे सपाटीकरण व उंचीकरणासाठी खाेदकाम करत हाेते. त्यावेळी पाेलीस हवालदार राजकुमार पत्रे यांच्यासह आशिष राजकुमार पत्रे, शुभम राजकुमार पत्रे (सर्व रा. गुरुकुंज काॅलनी, विद्यानगर, भंडारा) यांनी निरंजन यांच्यासाेबत वाद घातला तसेच शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. यावेळी निरंजन यांचा मुलगा प्रफुल आणि पुतण्या यांनाही जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी जवाहरनगर पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तर याच प्रकरणात दुसऱ्या गटातर्फे भाग्यलक्ष्मी राजकुमार पत्रे यांनी तक्रार दिली. त्या आपल्या शेतात गेल्या असता, आराेपी निरंजन दमळू मुस्कारे, नितेश मुस्कारे आणि पप्पू मुस्कारे हे जेसीबीच्या सहाय्याने खाेदकाम करताना दिसले. याचा जाब विचारला असता, त्यांनी शिवीगाळ करुन भाग्यलक्ष्मी त्यांचा मुलगा, सासू-सासरे आणि पती राजकुमार पत्रे यांना मारहाण केली. या मारहाणीत हे सर्वजण जखमी झाले. या प्रकरणी जवाहरनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.