अखेर शेतकऱ्यांचे धान माेजण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:29 AM2021-07-25T04:29:56+5:302021-07-25T04:29:56+5:30
लाखांदूर तालुक्यातील दिघाेरी येथील धान खरेदी केंद्रावर अद्यापही शेतकऱ्यांच्या धानाची माेजणी झाली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरी धान पावसात पडून ...
लाखांदूर तालुक्यातील दिघाेरी येथील धान खरेदी केंद्रावर अद्यापही शेतकऱ्यांच्या धानाची माेजणी झाली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरी धान पावसात पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदाेलनाचा इशारा दिला. शनिवारी रस्ता राेकाे आंदाेलन करण्यासाठी दिघाेरी येथील हनुमान मंदिरासमाेर एकत्र आले. ही माहिती प्रशासनाला हाेताच जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे, नायब तहसीलदार पाताेडे, ठाणेदार गावंडे, राजू पालीवाल यांनी दिघाेरी गाठले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. खासगी व्यापारी क्विंटल मागे सहाशे रुपयांची तफावत ठेवत आहे. त्यामुळे आधारभूत केंद्रावर धान खरेदी करावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी ऑनलाइन सात-बारा झालेल्या शेतकऱ्याचे धान साेमवारपासून खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावरून शेतकऱ्यांनी आंदाेलन मागे घेतले. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, शंकर खराबे, गुलाब कापसे, मार्तंड हुकरे, काेमल करंजेकर, दीपक चिमणकर, प्रकाश आगाशे, राेहिदास देशमुख, संजय धकाते, जितेंद्र चेटुले, अनिल अवचट, गाेपाल गभणे, गाेपी मेश्राम, यशवंत वरकडे, मुखरु कापसे आदी उपस्थित हाेते.