रानगव्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमीला आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:34 AM2021-04-15T04:34:10+5:302021-04-15T04:34:10+5:30
ज्ञानेश्वर बाळकृष्ण मेश्राम (४०) रा.पुयार असे घटनेतील गंभीर जखमीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी घटनेतील तरुण गावालगतच्या जंगल परिसरात मोहफुले ...
ज्ञानेश्वर बाळकृष्ण मेश्राम (४०) रा.पुयार असे घटनेतील गंभीर जखमीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी घटनेतील तरुण गावालगतच्या जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. घनदाट जंगल असल्याने मोठ्या संख्येने वन्यप्राणीही जंगलात दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी घटनेतील तरुण सकाळच्या सुमारास जंगलात मोहफुले वेचत असताना अचानक एका रानगव्यांच्या कळपाने घटनेतील तरुणावर हल्ला चढविला. या हल्ल्यात घटनेतील तरुण गंभीररीत्या जखमी झाला. जखमीला उपचारार्थ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून वनविभागाला माहिती दिली. माहितीवरून लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित यांच्या मार्गदर्शनात घटनेचा पंचनामा व जखमीचे बयान नोंदवीत शासन मदतीसाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.
तथापि घटनेतील जखमीची प्रकृती गंभीर असून, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तातडीची मदत म्हणून जखमीवर पुढील उपचारासाठी कुटुंबीयांना २० हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित, वनरक्षक आर. आर. दुनेदार, एम.एस. चांदेवार, प्रकाश देशमुख, सुभाष खिलवानी, बबलू राऊत, जितू लांजेवार यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.