भंडारा जिल्हातील पहिले घरकुल मार्ट लाखनी तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:38 AM2021-02-05T08:38:33+5:302021-02-05T08:38:33+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाखनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल बांधकाम होत असल्याने सर्व घरकुलधारकास विभागाच्या योजनांचा लाभ कृतीसंगमद्वारे मिळवून ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाखनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल बांधकाम होत असल्याने सर्व घरकुलधारकास विभागाच्या योजनांचा लाभ कृतीसंगमद्वारे मिळवून देण्याचे निर्देश आहेत. त्यातच उमेदमार्फत त्यांचे उपजीविका विकास हे अभिनव उपक्रम करण्याचे असून, सर्व घरकुल लाभार्थींपैकी महिला सदस्यांना बचतगटात सहभागी करून त्यांना त्यांचे जीवनमान उंचाण्यासाठी उमेद अंतर्गत वेगवेगळ्या, सदस्यच्या गरजेनुसार व उपलब्ध सोर्सनुसार व्यवसायामध्ये सहभागी करून घेणे, सुरू असलेल्या व्यवसायाला चालना देऊन विकसित करण्याचे कार्य सुरू आहे. यामध्येच घरकुल बांधकामाकरिता सर्व लाभार्थींना त्यांच्या मागणीनुसार वाजवी दरात घरकुलाला लागणारे सर्व साहित्य लगतच्या ग्रामसंघामार्फत पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. याची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडाराचे मनीषा कुरसुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शेखर जाधव यांच्या नेतृत्वाखाली उमेद भंडाराचे गौरवकुमार तुरकर यांचे सहकार्याने तालुका लाखनी येथे उमेद घरकुलमार्टचे उद्घाटन पिंपळगाव येथे येथील रूपाली लांजेवार व पालंदूर येथील सुनीता काटेखाये यांच्याकडे करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा व्यवस्थापक उमेद दिलीप पाटील, तालुका समन्वय आपत्ती व्यवस्थापन नरेश नवखरे, सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील व ग्रामसंघ सदस्य तसेच समूह सदस्य उमेदची सर्व तालुका सदस्य उपस्थित होते. घरकुल मार्ट अंतर्गत लाभार्थींला घरकुल बांधकामासाठी लागणारे साहित्य वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. घरकुल मार्टमध्ये उपलब्ध वस्तूंची यादी घरकुल लाभार्तींपर्यंत पोहोचवणे, मालाची मागणी नोंदवणे, मालाचा पुरवठा करणे व इतर अनुषंगिक सर्व कामकाज ग्रामसंघ व बचतगटाच्या माध्यमातून केले जाणार आहे. घरकुल लाभार्थींनी घरकुल बांधकामासाठी आवश्यक असणारे साहित्य रोखीने खरेदी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमासाठी रूपेश लांजेवार, संजय कातेखाये, दहीकर, निखिल जुंबले यांनी केले. प्रास्ताविक लाखनी तालुका अभियान व्यवस्थापक उमेद सविता तिडके यांनी केले. आभार प्रदर्शन तालुका व्यवस्थापक उमेश उके यांनी मानले.
कोट
“लाखनी तालुक्यात केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या माध्यमातून २००० पेक्षा जास्त घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. अजून एक हजार घरकुल मंजूर करण्यात येणार आहेत. या सर्व लाभार्थींना घर बांधण्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. घरकुल मार्टमधून साहित्य खरेदी करावे. भविष्यात घरकुल लाभार्थींना शासन नियमानुसार ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
- डॉ. एस.बी. जाधव,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, लाखनी