गोसीखुर्द प्रकल्पातून हाेणार पाच हजार क्यूसेक विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:29 AM2021-07-25T04:29:53+5:302021-07-25T04:29:53+5:30
धरणाचे पाणलोट क्षेत्रासह मध्य प्रदेशात दमदार पाऊस सुरू आहे. गतवर्षी थोडा निष्काळजीपणा झाल्याने धरणातील पाणीसाठा बेसुमार वाढला व मोठ्या ...
धरणाचे पाणलोट क्षेत्रासह मध्य प्रदेशात दमदार पाऊस सुरू आहे. गतवर्षी थोडा निष्काळजीपणा झाल्याने धरणातील पाणीसाठा बेसुमार वाढला व मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. परिणामी वैनगंगेला महापुराला. प्रशासनाची दमछाक झाली होती. घरांचे, शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. गतवर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन यावर्षी प्रशासन सतर्क झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पात शनिवारी सकाळी ७ वाजता २४३.१३० मीटर पाणीपातळी होती. त्यावेळी २३ दरवाजे अर्धा मीटरने उघडून २६७९.८२२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दिवसभर पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सायंकाळी ६ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडून प्रकल्पातून पाच हजार क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्याचे नियाेजन आहे. धरण स्थळापासून वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
240721\img_20210723_144025.jpg
गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले आहेत.