शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

‘मिशन झीरो पेंडन्सी’अंतर्गत समस्या त्वरित निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:21 AM

वडेगाव : ‘मिशन झीरो पेंडन्सी’अंतर्गत शिक्षकांच्या कोणत्याही कार्यालयीन समस्या प्रलंबित न ठेवता त्या त्वरित निकाली काढाव्यात, अशी ...

वडेगाव : ‘मिशन झीरो पेंडन्सी’अंतर्गत शिक्षकांच्या कोणत्याही कार्यालयीन समस्या प्रलंबित न ठेवता त्या त्वरित निकाली काढाव्यात, अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी एम.डी. पारधी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

चर्चेत, दुय्यम सेवापुस्तक पूर्ततेसाठी केंद्रनिहाय नियोजन करावे, नामनिर्देशन तथा तालुकांतर्गत शिक्षकांच्या स्थानांतरणाची नोंद त्वरित मूळ सेवापुस्तकात घ्यावी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी टप्प्यानिहाय तक्त्याची एक प्रत लवकरच सर्व शिक्षकांना दिली जावी, सत्र २०१८-१९ च्या जीपीएफ पावत्या प्राप्त होताच केंद्रनिहाय रीतसर वाटप केले जावे, निवडश्रेणी व चटोपाध्याय नवीन प्रकरण तयार करून जि.प. कडे सादर करावे हे विषय मांडण्यात आले. यावर पारधी यांनी आपल्या स्तरावरील सर्वच समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

संचालन अशोक बिसेन यांनी केले. आभार नोकलाल शरणागत यांनी मानले. चर्चेला शिक्षक समितीचे शाखाध्यक्ष पी.आर. पारधी, जिल्हा कार्याध्यक्ष डी.एच. चौधरी, तालुकाध्यक्ष संजय बोपचे, तालुका सरचिटणीस विलास डोंगरे, संचालक प्रदीप रंगारी, माजी संचालक वाय.बी. चव्हाण, कार्याध्यक्ष टी.के. बोपचे, जिल्हा महिला प्रतिनिधी अल्का बडवाईक, तालुका नेते आर.एच. ठाकरे, बी.सी. ठाकरे, मनोज गेडाम, राजेश जौंजाळ, अशोक रिनाईत, परमानंद धार्मिक, तानसेन जमईवार, राजू गाढवे, राकेश शहारे आदी उपस्थित होते.

परीक्षा शुल्क जि.प. निधीतून भरा

चर्चेत, ‘भरारी’ उपक्रमांतर्गत इयत्ता ५ व ८ वीतील जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून भरण्याची संघटनेची मागणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे मांडावी, तसेच कोविड-१९ च्या कारणास्तव शैक्षणिक नुकसान झालेल्या सत्र २०२०-२१ मधील इयत्ता १ ते ८ मधील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पद्धतीविषयी विचारणा करण्यात आली. यावर पारधी यांनी, सकारात्मकता दर्शविली, तसेच शक्यतोवर आकारिक मूल्यमापन पद्धतीनुसार मूल्यांकन होणार. तरीपण जिल्हा परिषदेच्या निर्देशांची वाट पाहू व नंतर ठरवू, असे सांगितले.