भंडाऱ्यात दोन लाखांची लाच मागणारा वनअधिकारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:50 AM2017-11-14T11:50:17+5:302017-11-14T11:51:50+5:30

रकमेची वसुली न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागणारा विभागीय वन अधिकारी योगेश वाघाये याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली.

The forest officials demanding a bribe of two lakh in the store | भंडाऱ्यात दोन लाखांची लाच मागणारा वनअधिकारी जाळ्यात

भंडाऱ्यात दोन लाखांची लाच मागणारा वनअधिकारी जाळ्यात

Next
ठळक मुद्देएसीबीची कारवाई वनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार

आॅनलाईन लोकमत
भंडारा : न झालेल्या कामांचे बिल जमा झाल्यानंतर घोटाळा उघडकीस आल्याने रकमेची वसुली न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागणारा विभागीय वन अधिकारी योगेश वाघाये याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली.
भंडारा येथील सामाजिक वनीकरण विभागातील या कारवाईमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामाजिक वनीकरण, वनपरिक्षेत्र तुमसर येथे सन २०१५ व २०१६ मध्ये वनपरिक्षेत्रात विविध कामांमध्ये गैरप्रकार केले असल्याचे आरोप करून तक्रारदार यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. एकूण ३४,५१,००० रूपये कामांपैकी, ७,०१५२५ रूपयांची कामे झाली नसल्याने त्या पैशांची वसुली न करण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारकर्त्यांनी भंडारा येथील एसीबीकडे तक्रार केली होती.
योेगेश वाघाये एसीबीच्या सापळ्यात अडकताच त्याच्याविरूद्ध तुमसर पोलीस ठाण्यात कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंदविला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, नापोशी सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, श्रीकांत हत्तीमारे, दिनेश धार्मिक यांनी कामगिरी बजावली.

Web Title: The forest officials demanding a bribe of two lakh in the store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा