असे म्हणू लागले आहेत.
बॉक्स
शासन नियमाचे पालन करा
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा कहर झाला होता. त्यानंतर आता काही प्रमाणात कोरोना संसर्ग कमी झाला असला तरीही जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. यासाठी अनेक नागरिकही नियमांचे पालन करीत आहेत. मात्र काही दुकाने दुपारी ४ नंतर उघडी दिसत असल्याने अनेक नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यासाठी पुन्हा नगर परिषदेच्या फिरत्या पथकाने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. भंडारा शहरात मुख्य मार्गावरील दुकाने सुरू राहत असल्याने आतील भागात असणारे दुकानदारी बिनधास्त राहत आहेत.
बॉक्स
कोरोना उपाययोजनांसाठी सर्वांचाच पुढाकार हवा
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर एप्रिल महिन्यात झाला होता. त्यामुळे आता पुन्हा तशी परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी सर्व नागरिकांसह व्यापारी, दुकानदार, वाहनधारक सर्वांनी एकत्रित येऊन कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर वेळीच आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
बॉक्स
कोरोनाचे कारणाने ग्राहकांची लूट
भंडारा शहरात अनेक दुकानदार मालाचे शॉर्टेज असल्याचे वारंवार कारण सांगून जादा दराने वस्तूंची विक्री करत आहेत. प्रत्यक्षात कोरोनामुळे फारशी महागाई वाढलेली नाही. मात्र अनेक जण कोरोनाचे कारण सांगूनच ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा दराने लूट करीत आहेत. यासाठी प्रशासनाने अचानक भेटी देऊन अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची गरज आहे. पोलिसांची गाडी वारंवार राहिल्यास ग्राहकही नियमांचे उल्लंघन करणार नाहीत. यासाठी पोलीस प्रशासन व भंडारा नगर परिषद प्रशासनाने एकत्रित कारवाई करण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे.