कोरोना संकटात घरगुती वीज देयके माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:00 AM2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:37+5:30

देशात व राज्यात आलेल्या कोरोना आपत्तीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, हातावर काम करणारे सुशिक्षित कामगार, छोटे दुकानदार, सलून व्यवसायीक, पानटपरी चालक, मॉल आणि इतर जागी काम करणाºया होरपळून निघालेले आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. दोनवेळच्या जेवणालाही ते महाग झालेले आहेत. अशा स्थितीत वीज देयके कसे भरावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा आहे.

Forgive household electricity payments in Corona crisis | कोरोना संकटात घरगुती वीज देयके माफ करा

कोरोना संकटात घरगुती वीज देयके माफ करा

Next
ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांना निवेदन : ओबीसी क्रांती मोर्चाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संकटकाळातील वीज देयके माफ करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
देशात व राज्यात आलेल्या कोरोना आपत्तीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, हातावर काम करणारे सुशिक्षित कामगार, छोटे दुकानदार, सलून व्यवसायीक, पानटपरी चालक, मॉल आणि इतर जागी काम करणाºया होरपळून निघालेले आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. दोनवेळच्या जेवणालाही ते महाग झालेले आहेत. अशा स्थितीत वीज देयके कसे भरावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा आहे.
केंद्र शासनाने संकटात सापडलेल्या नागरिकांना सहकार्य करण्याची आवश्यकता असता त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून येत आहे. सर्व सामान्यांना आर्थिक मदत करण्याऐवजी ते गरीब आणि भूके, तहानेण्या व्याकूळ झालेल्या मजुरांवर अत्याचार करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे. अशा संकटकाळात किमान महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांवर कृपादृष्टी करून कोरोना काळातील वीज देयके माफ करून त्यांना जीवंत राहण्याचा मार्ग सुलभ करावा, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्यावतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक, अध्यक्ष संजय मते, संयोजक सुकराम देशकर, राजेश इसापुरे, धमेंद्र बोरकर, जिजोबा पारधी, नरेंद्र पहाडे, शोभा बावनकर, वाडीभस्मे, राहूल दमाहे, पुरूषोत्तम नंदूरकर, पवन मस्के, गणेश निमजे, जीवन भजनकर, इमरान शेख, विलास साकुरे आदींचा समावेश होता.

गावागावांत देयक माफ झाल्याच्या चर्चेला उधाण
कोरोना संकटकाळात मीटर रिडिंग व घरापर्यंत वीज देयक प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे अनेकांनी तीन महिन्यांचे देयक अदा केलेले नाही. आता तीन महिन्याचे वीज देयक भरणे अनेकांना कठीण होणार आहे. गत तीन महिन्यात अनेकांना घरीच रहावे लागले. त्यामुळे त्यांच्यावर संकट आहे. अशा काळात आता वीज देयक भरणे कठीण झालेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे वीज देयक शासनाकडून माफ करण्यात येणार असल्याची चर्चा गावागावांत होत आहे. राज्य शासनाने संकटकाळातील घरगुती वीज ग्राहकांचे वीज देयक माफ करण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Forgive household electricity payments in Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज