धडक सिंचन विहिरींच्या निधी रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:56+5:302021-01-23T04:35:56+5:30
तुमसर : जिल्ह्यात १५०० धडक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यात तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४१२ विहिरींच्या ...
तुमसर : जिल्ह्यात १५०० धडक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यात तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४१२ विहिरींच्या समावेश आहे काही शेतकऱ्यांना प्रथम देण्यात आले परंतु नऊ ते दहा महिन्यापासून अद्याप शेतकऱ्यांना देयके मिळाली नाहीत त्यामुळे बांधकाम करण्यात आलेल्या खर्चाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात भाजपने तहसालदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्यात ४१२ धडक सिंचन विहिरी शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आल्या काही शेतकऱ्यांना विहिरींच्या प्रथम देयक देण्यात आले, परंतु मागील नऊ ते दहा महिन्यांपासून उर्वरित विहिरींचा निधी देण्यात आला नाही त्यामुळे विहिरींचे बांधकाम रखडलेले आहे. बांधकाम करण्यात आलेल्या विहिरीचा खर्च परतफेड कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा झाला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता राज्य शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ विहिरींच्या निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना शिष्टमंडळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे, डोंगरल्याचे सरपंच उमेश बघेले, बोरीचे सरपंच अविनाश उपरीकर, दीपक सरादे, अंजना सरादे, राजकिरण पटले, आशिष पारधी, अनिल पटले, दिनेश पटले, नामदेव पारधी, आकाश पारधी, संजय टेंबरे, विजय तिवारी, धर्मपाल रामटेके, देवीलाल भगत इत्यादी शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाण्याची गरज आहे. राज्य शासनाने धडक सिंचन विहीर योजना राबविण्याचे धोरण ठरविले, परंतु शासनाकडून आता निधी वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यात असंतोष व्याप्त आहे.