लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप सरकार हे खोटारडे आहे. गेल्या पाच वर्षात पूर्वापार चालत आलेल्या अनेक विकासाभिमुख योजना बंद पाडल्या. आश्वासने द्यायची मात्र त्याचे पालन करायचे नाही हा यांचा उद्योग आहे. गोरगरीब जनतेला स्वखर्चाने जनधन खाते उघडविण्यात आले. मात्र हे खाते ठणठण असून बंद पडले आहेत, असे वक्तव्य खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, पिरीपाचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचे प्रचारार्थ येरंडी महागाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. या वेळी नाना पंचबुद्धे, लोकपाल गहाणे, गिरीष पालीवाल, यशवंत परशुरामकर, अॅड. के.आर. शेंडे, राजेश नंदागवळी, मनोहर चंद्रिकापुरे, सुनील फुंडे, प्रमोद लांजेवार, चंद्रशेखर ठवरे, नागपूरचे आ. प्रकाश गजभिये, बंडू भेंडारकर, नारायण डोंगरवार, चित्रलेखा मिश्रा, शामकांत नेवारे, आनंदकुमार जांभुळकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, भाष्कर आत्राम, राकेश लंजे, विशाखा साखरे, जगदीश मोहबंशी, नितीन पुगलिया, माणिक घनाडे, पुरुषोत्तम बाबा कटरे, बबन कांबळे, किरण कांबळे, शिशुकला हलमारे, रतिराम राणे, सुधीर साधवानी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, स्व. मनोहरभाई पटेल यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगोत्री आणली. इटियाडोह धरण निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या माध्यमातून येथील शेती सुजलाम सुफलाम झाली.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसचे सरकार असताना धानाला २९०० रुपये प्रती क्विंटल हमी भाव होता. गेल्या ५ वर्षात किती भाव मिळाला हे तुम्हालाच ठाऊक आहे. निवडणुकीच्या तोंडावर ५०० रुपये बोनस जाहीर केला याचा लाभ शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना मिळाला याचा विचार करा. शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वार्षिक मदत देण्याचे मोदींनी जाहीर केले.काहींच्या खात्यात पैसे आले व ते परत गेले. आमचे सरकार सत्तेवर आल्यास अडीच हजार रुपये प्रती क्विंटल धानाला भाव देवू व राहुल गांधी यांनी बोलल्याप्रमाणे २० टक्के गरीब कुटुंबांना किमान ६ हजार रुपये प्रतिमाह देण्याच्या आश्वासनाचे आम्ही समर्थन करीत असल्याचे सांगितले. पेट्रोल, डिझेल, गॅसवर अवाढव्य कर घेतले जात आहे. जीएसटी लागू केली. प्रत्येक व्यक्तींकडून शासनाची कर वसूली सुरु आहे. देताना मात्र काहीच दिले जात नाही.दोन वर्षापासून मग्रारोहयोचे चुकारे मिळाले नाही. निराधारांचे पैसे, ओबीसींची शिष्यवृत्ती मिळाली नाही. केरोसिन, रेशन बंद झाले.बीआरजीएफ, नक्षल, ३०५४, ५०५४, सर्व शिक्षा अभियान, एनआरएचएम सारख्या योजना बंद केल्या.शेतकºयांकडून बळजबरीने पिक विमा घेतला जात आहे. मात्र लाभ कुणालाच दिला जात नाही. हे सरकार सामान्य माणसाच्या विरोधी आहे.नोटाबंदी, जीएसटीमुळे लहान उद्योग बंद पडले. चौकीदारी कुठेतरी थांबली पाहिजे. ही देशाची निवडणूक आहे.आम्हाला काम करणारे चौकीदार पाहिजे खोटारडे नाही. भारतात लोकशाही आहे, ती संविधानामुळे टिकून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. यावरच देशाचा डोलारा उभा आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले.
गोरगरिबांचे जनधन खाते झाले ठणठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:09 AM
भाजप सरकार हे खोटारडे आहे. गेल्या पाच वर्षात पूर्वापार चालत आलेल्या अनेक विकासाभिमुख योजना बंद पाडल्या. आश्वासने द्यायची मात्र त्याचे पालन करायचे नाही हा यांचा उद्योग आहे. गोरगरीब जनतेला स्वखर्चाने जनधन खाते उघडविण्यात आले.
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचारसभा