घाटांचा लिलाव नाही, बांधकाम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:51 PM2018-11-13T23:51:41+5:302018-11-13T23:52:00+5:30

जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे.

Ghat's auction is not auctioned; | घाटांचा लिलाव नाही, बांधकाम जोमात

घाटांचा लिलाव नाही, बांधकाम जोमात

Next
ठळक मुद्देरेती तस्करीला उधाण : खनिकर्म व महसूल विभागाचे साटेलोटे, रेतीचे प्रचंड साठे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे. खनिकर्म आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी रेती तस्करांच्या दावणीला बांधल्याचे दिसत आहे. कारवाईचा केवळ फार्स करून तस्करांना रेतीघाट मोकळे करून दिले जात आहे.
भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या विशाल पात्रात रेतीचा प्रचंड खजाना आहे. वैनगंगेतील रेतीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच या रेतीचे उत्खनन करण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरु असते. वैनगंगेसोबतच जिल्ह्यातील चुलबंद, सुरनदी, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नाल्यांमधूनही रेतीचे उत्खनन केले जाते. रेती उत्खननासाठी महसूल विभाग लिलावाच्या माध्यमातून कंत्राट दिले जाते. नियमानुसार याठिकाणी उत्खनन करणे गरजेचे असते. यातील महत्वाचा नियम म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त असेच उत्खनन करावे लागते. रात्रीच्यावेळी उत्खनन करता येत नाही. तसेच ट्रेझर बोर्ड अथवा जेसीबी मशीनच्या साहायाने उत्खननावर प्रतिबंध असतो. पंरतु एकदा कंत्राट मिळाले की मनमानेल त्या पध्दतीने रेतीचे उत्खनन केले जाते. यंदा तर एकाही रेती घाटाचा लिलाव अद्याप झाला नाही. मात्र रेतीचे खुलेआम उत्खनन सुरु आहे. अहोरात्र रेतीचे वाहने धावत असतात. अनेकांनी तर घाटाचा नजिक रेतीचे साठे तयार केले आहे. या ठिकाणावरुन रेतीची विक्री केली जाते.
अवैध रेती तस्करीवर आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभागाची असते. उपविभागीय अधिकारी ते तलाठी यांची या रेती तस्करीवर आळा घालण्याची जबाबदारी असते. त्यासाठी महसूल विभाग पथकही तयार करते. तहसीलदारांच्या नेतृत्वातील भरारी पथक कारवाई करते. पंरतू या कारवाईचेही मोठे गोडबंगाल असते. पोलीस विभागही या कारवाईत सहभागी होतात. परंतू अद्यापपर्यंत रेतीतस्करांवर मोठी कारवाई झाली नाही.
भंडारा जिल्ह्यासह सर्वत्र वैनगंगेची रेती उपलब्ध होत आहे. लिलाव झाले नसतांनाही बांधकाम जोमात सुरु असल्याने ही रेती नेमकी कुणाच्या आशीर्वादाने पोहचते हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सर्वांचेच यात हात ओले केल्या जातात. मात्र या सर्व प्रकारात पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे.
पर्यावरणप्रेमींचे दुर्लक्ष
वन्यजीवांचा संदर्भात गळा काढणारे पर्यावरण प्रेमी राज्यात सुरु असलेल्या रेती तस्करहीबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाही. पर्यावरण विभागाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव करता येत नाही. मात्र भंडारा जिल्ह्यात लिलावापूर्वीच उत्खनन सुरु आहे. त्यामुळे पर्यारणाचे प्रचंड नुकसान होत आहे. वाहतुकीमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. नद्यांची नैसर्गिक संरक्षण भिंत थडीही वाहतूकीसाठी खचविल्या जात आहे. हा सर्व प्रकार बिनबोभाट सुरु असतांना पर्यावरण प्रेमी मूग गिळून आहेत.

Web Title: Ghat's auction is not auctioned;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.