कंत्राटी नर्सेसना मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:43+5:302021-07-12T04:22:43+5:30
युनियनचे अध्यक्ष व आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी दिला. राणा भवन भंडारा येथे भंडारा जिल्हा कंत्राटी आरोग्य कर्मचारी ...
युनियनचे अध्यक्ष व आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी दिला.
राणा भवन भंडारा येथे भंडारा जिल्हा कंत्राटी आरोग्य कर्मचारी युनियनची सभा युनियनचे अध्यक्ष हिवराज उके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. त्या सभेत ते बोलत होते.
या सभेत कोरोनाच्या कामासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना शासन प्रशासनाने तीन - तीन महिन्याचे नियुक्ती आदेश देऊन बेरोजगारीची जीवघेणी टांगती तलवार ठेवली आहे. एकीकडे कोरोना योद्ध्यांना न्याय देऊ म्हणायचे आणि दुसरीकडे प्रशासनाने आपली जबाबदारी टाळायची हा अन्याय आहे. आणि म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी अनेक विविध निर्णय घेण्यात आले. त्यात कंत्राटी आरोग्य सेविकांची (एएनएम) नियुक्ती आदेशाची मुदत १२ जुलैला संपुष्टात येत असल्याने १३ जुलैपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत सामूहिक आंदोलन करण्यात येईल, १३ जुलैला राणा भवन भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील कंत्राटी नर्सेस व एकूणच कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात येईल व अविलंब आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. या मुदतवाढीच्या मागणीचा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी समर्थन केला असून त्या आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे.
सभेचे संचालन सचिव मनीषा तीतिरमारे यांनी केले. सभेसाठी वैशाली लेंडे, ऋतुजा साठवणे, राधा आगलावे, सीमा चौधरी, नंदा कोसरकर, निकिता खोबरागडे, कोमल सांगोडे, श्वेता मेश्राम, किरण वासनिक, रिता मेश्राम, स्नेहा पारधी, पवित्र मेश्राम, शुभांगी खरोले, कीर्ती गायकवाड लक्ष्मी पैंगर आदींनी सहकार्य केले.