शासकीय जागेवरील अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:31 AM2021-01-13T05:31:42+5:302021-01-13T05:31:42+5:30

भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ज्या नागरिकांकडे झोपडी किंवा घर बांधण्यासाठी चतकोर जागा नव्हती, अशा नागरिकांनी गावाशेजारच्या शासकीय जागेवर अतिक्रमण ...

Give land leases to encroachers on government land | शासकीय जागेवरील अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या

शासकीय जागेवरील अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या

googlenewsNext

भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ज्या नागरिकांकडे झोपडी किंवा घर बांधण्यासाठी चतकोर जागा नव्हती, अशा नागरिकांनी गावाशेजारच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून चंद्रमोळी झोपडी बांधून आपल्या कुटुंबीयांची कशी तरी राहण्याची व्यवस्था केली आहे, अशा नागरिकांचे आजही कुटुंबीयांसह त्या ठिकाणी वास्तव्य आहे. अशा नागरिकांना प्रशासनाकडून घरकुल मंजूर झाले. मात्र, त्यांना या जागेचे पट्टे सादर करा असा तगादा लावत असून या अटीमुळे मंजूर झालेले घरकुल नामंजूर होणार आहे. त्यामुळे आता वेळेवर पट्टे कोठून आणायचे, असा प्रश्न या नागरिकांसमोर आ वासून उभा ठाकला आहे. या नागरिकांना वेठीस धरण्यात येत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, अंबादास नागदेवे, संदीप बर्वे, बंडू फुलझेले, रतन मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहीवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, सुभाष शेंडे, दामोधर उके, जयपाल रामटेके, अविनाश खोब्रागडे, नीकाराम शेंडे, सुरेश गेडाम, अविनाश बोरकर, शांताराम खोब्रागडे, नत्थु सूर्यवंशी, उमाकांत काणेकर, नंदू वाघमारे, नितीश काणेकर, यशवंत घरडे, मोरेश्वर लेंढारे, मच्छिंद्र टेंभुर्णे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Give land leases to encroachers on government land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.