लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पावसाळ्याचे अडीच नक्षत्र लोटले असताना पुरेशा पावसाअभावी शेतात रोवणी योग्य पाण्यासाठी सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. मात्र गत काही दिवसांपूर्वी गोसे धरणाचे पाणी डाव्या कालव्यात सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील शेतशिवारात थोड्याफार प्रमाणात पोहोचल्याने येत्या काही दिवसात शेतात रोवणी योग्य पाणी साठवून खरिपातील धानपीक रोवणी ला येण्याची चिन्हे दिसत आहेत. धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात जवळपास तीस गावांचा समावेश आहे. या गावातील काही भागात गोसे धरणाच्या डाव्या कालव्याचे कमी-अधिक प्रमाणात बांधकाम झाले आहे. काही भागात सबंधित कालव्याचे बांधकाम अर्धवट असल्याने पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या व कालव्याच्या पाण्याने या भागातील धान शेती बुडतअसल्याने सदर कालवा शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे आरोप केले जातात.मात्र सद्यस्थितीत या भागात आत्तापर्यंत पावसाने दमदार हजेरी न लावल्याने खालील नर्सरी व आवत्या धान पिकासह अन्य पिके देखील करण्याच्या मार्गावर होती. या भागात मोठ्या प्रमाणात कृषी वीज पंप असल्याने या संकटावर मात करण्यात शेतकºयांना काही अंशी यश देखील आले. मात्र रोवणी योग्य धान पऱ्हे होऊनही शेतात पावसाअभावी पाण्याची साठवण झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी गोसे धरण आंतर्गत चौरास भागातील डाव्या कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने या भागातील सर्व शेतकरी शेतात पाणी साठवणुकीच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. पावसाचे पूर परिस्थितीत धान उत्पादक शेतकºयांना कर्दनकाळ ठरणारा हा कालवा सध्या मात्र पावसाअभावी वरदान ठरल्याचे बोलले जात आहे.
सिंचनासाठी गोसे धरणाचे पाणी डाव्या कालव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:00 AM
धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील शेतशिवारात थोड्याफार प्रमाणात पोहोचल्याने येत्या काही दिवसात शेतात रोवणी योग्य पाणी साठवून खरिपातील धानपीक रोवणी ला येण्याची चिन्हे दिसत आहेत. धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात जवळपास तीस गावांचा समावेश आहे. या गावातील काही भागात गोसे धरणाच्या डाव्या कालव्याचे कमी-अधिक प्रमाणात बांधकाम झाले आहे.
ठळक मुद्देचौरास भागातील शेतकऱ्यांना दिलासा : पऱ्ह्यांना नवसंजीवनी