लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भातील सर्वात मोठे महत्वाकांक्षी इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प अर्थात गोसे धरणाच्या भूमिपूजनाला आता ३२ वर्ष पूर्ण होत आहेत. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाºया या प्रकल्पाचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असून केंद्र व राज्य सरकार आर्थिक संकटात आहेत. त्याचा परिणाम आगामी काळात गोसे प्रकल्पाच्या विकास कामावर होण्याची शक्यता आहे.पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. ३२ वर्षापूर्वी २२ एप्रिल १९८८ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु ३२ वर्षाच्या काळात गोसेखुर्द प्रकल्प या ना त्या कारणाने गाजत गेले. राज् य आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चा होत राहिली. प्रकल्पाची किंमत अनेक पटीने वाढली. भूमिपूजनाच्या वेळेस या प्रकल्पाची नियोजित किंमत ३७२ कोटी होती. आज हा प्रकल्प २५ हजार कोटी रुपयांचा झाला आहे. या धरणावर जवळपास १३ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. आणखीनही मोठ्या निधीची गरज आहे.गोसे धरणाच्या उजव्या कालव्याचे १०७ किलोमीटर काम झाले आहे. पण या कालव्याचे उपकालवे, पाटसºया बांधण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अत्यल्प पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा तलावापर्यंत पोहचत आहे. अधिक पाणी सोडल्यास कालवा फुटण्याची भीती आहे. हीच स्थिती डाव्या कालव्याची आहे. या कालव्याच्या तळाचे व अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. तरीही शेतकºयांसाठी सिंचनाला पाणी सोडले जात आहे.यावर्षी गोसे प्रकल्पात २४४.५० मीटर पर्यंत पाणी साठविले आहे. अद्याप १० गावांचे पुनर्वसन व्हायचे आहे. २४५ मीटर पर्यंत पाणी वाढण्यापूर्वी या गावांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. या धरणामध्ये वैनगंगा नदीला आंभोरा जवळ नागपुरातून वाहणारी नाग आणि पिवळी नदी येऊन मिळते. त्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे.गोसेखुर्द धरणाला ३२ वर्ष पूर्ण होत असताना अद्यापही बहुतांश कामे रखडली आहेत. ज्या उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात आला तोही पूर्णत्वास गेला नाही. आता तर कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. सरकार आर्थिक संकटात आहे. यामुळे निधी मिळताना या प्रकल्पाला अडचणींचा सामना करावा लागेल.प्रकल्पातील बांधकामाचे गैरप्रकार गाजलेगोसेखुर्द धरणामध्ये अनेक गैरप्रकार झाले असून ते चांगलेच गाजले. चितळे समितीच्या आक्षेपानुसार निविदा मंजूर करण्यापासून परवानगी न घेतलेली कामे व बांधकामामध्ये अनियमितता आढळून आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने अनेक कंत्राटदार, अभियंते अधिकाºयांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक कामांची चौकशी सुरु आहे. गोसे धरणाच्या १६०० कोटी रुपयांच्या निविदाही रद्द करण्यात आल्या आहेत.
गोसे प्रकल्प ३२ वर्ष होऊनही रखडलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 5:00 AM
वनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. ३२ वर्षापूर्वी २२ एप्रिल १९८८ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु ३२ वर्षाच्या काळात गोसेखुर्द प्रकल्प या ना त्या कारणाने गाजत गेले. राज् य आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चा होत राहिली. प्रकल्पाची किंमत अनेक पटीने वाढली.
ठळक मुद्देलॉकडाऊनचाही परिणाम होणार : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी २२ एप्रिल १९८८ ला केले होते भूमिपूजन