भागवत सप्ताह निमित्ताने नेरला पहाडावर गोवर्धन पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:31 AM2021-02-08T04:31:11+5:302021-02-08T04:31:11+5:30
नेरला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यासाठी नेरला ग्रामवासीयांनी रोज रामधून व कीर्तन फेरीत ...
नेरला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यासाठी नेरला ग्रामवासीयांनी रोज रामधून व कीर्तन फेरीत मोठ्या संख्येने भाग घेतला. श्रीमद भागवत सप्ताहाची सुरुवात ३ फेब्रुवारीला झाली असून, ९ फेब्रुवारीला गोपाल काला व महाप्रसाद वितरण होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन यावेळी आयोजकांनी केली आहे. अड्याळ, सावरगाव, वडद, इटगाव, कलेवाडा, पहेला, चिखली, पालोरा, पिलांद्री इत्यादी गावातील भजनी मंडळ दररोज पहाटे उपस्थित राहून गावातून रामधून फेरी काढण्यात येते. यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ एकत्रित येऊन सहभागी होतात. भागवत सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी रोज सकाळी व सायंकाळी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते.