उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहण्यासाठी शासन प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:18+5:302021-07-16T04:25:18+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज ...

The government is trying to keep the economic cycle of the industry going | उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहण्यासाठी शासन प्रयत्नशील

उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहण्यासाठी शासन प्रयत्नशील

Next

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, सुनील रंभाड, सनफ्लॅगचे समीर पटेल, प्रफुल्ल मेश्राम, मानस ॲग्रो इंडस्ट्रीजचे दिनेश परमारे, जिल्हा उद्योग केंद्राचे एस. आर. तिवारी, कुमार जैस्वाल, हिंदुस्थान कंपोझिटचे विजय भालेराव, अशोक लेलँडचे अरविंद बोरडकर, डॉ. रचना मित्तल, व्ही. आर. परिदा, आयध निर्माणीचे अभिलाष देशमुख, कपडा मर्चंटचे सोनू वाधवाणी उपस्थित होते.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी अर्थचक्र सुरू ठेवणे, उत्पादनांवर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. येणाऱ्या काळात कोरोनाचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षादेखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. याबाबत उद्योग समूहाने नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

ज्या कामगार काम करतात तो परिसर व यंत्रसामग्रीचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी व समस्या मांडल्या. शासनस्तरावरील बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील व जिल्हा स्तरावरील प्रश्न प्राधान्याने सोडविल्या जातील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: The government is trying to keep the economic cycle of the industry going

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.