स्टेशन टोली येथील शफी अन्सारी यांचे लग्न छत्तीसगड राज्यातील डोंगरगाव येथील हसीना अन्सारी हिच्यासाेबत झाले होते; परंतु त्यांचे एकमेकांशी न पटल्याने प्रकरण डोंगरगड न्यायालयात गेले. हसीना यांनी डोंगरगड न्यायालयात पोटगीसाठी दाद मागितली. न्यायालयाने पती-पत्नीला सामंजस्याने राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी दोघेही पती-पत्नी न्यायालयात हजर होणार होते; परंतु तत्पूर्वी ७ सप्टेंबरला हसीना यांचा स्टेशन टोली येथे आकस्मिक मृत्यू झाला. पतीने देव्हाडी येथील कब्रस्तानात कबर खोदली; परंतु हसीनाच्या भावाने व कुटुंबीयांनी हसीनाला ठार मारण्याचा आरोप शफीवर लावला. त्यानंतर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर हसीना यांचे पार्थिव डोंगरगड येथे त्यांच्या कुटुंबीयांनी नेले. कब्रस्तानातील कबर अखेर तशीच राहिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात देव्हाडी पोलीस दूर केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभणे, पोलीस शिपाई खराबे करीत आहे.
पतीने खोदली कबर, भावाने नेला मृतदेह स्वगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:42 AM