सिहोरा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:11+5:302021-03-10T04:35:11+5:30
उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनेंद्र तुरकर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख ...
उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनेंद्र तुरकर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, प्राचार्य ओ. बी. गायधने, सरपंच मधू अडमाचे, ग्रामविकास अधिकारी मेघराज हेडाऊ, आनंद मलेवार, मंगेश शहारे, विद्याधर तुरकर, तेजराम ठाकरे, शरद खेताडे उपस्थित होते. आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिरात हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. राहुल ठवरे , डॉ. सुशांत मुळे, डॉ. रमेश रवंधे, डॉ. अश्विन ठवरे, डॉ. प्रशांत नागलवाडे, डॉ. कौतुक वंजारी यांनी आरोग्य तपासणी केली. या शिबिरात २९ नागरिकांची ईसीजी करण्यात आली आहे. याशिवाय ४२९ नागरिक व १०५ विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीनंतर औषधोपचार देण्यात आले आहे. शिबिराचे संचालन एन. एल. गडदे यांनी केले. तर आभार एस. एम. टेंभरे यांनी मानले. शिबिराला के. के. पंचभाई, एन. एन. चौरे, एस. डी. देशमुख, आर.एल. गभने, एस. एस. शरणागत, पी. पी. उके, ए. डी. तुरकर, जे. एच. बनकर, ए. आर. गोटेफोडे, वाय. एस. कटरे यांनी सहकार्य केले.