या उपकेंद्राअंतर्गत गुरठा, गोंडेगाव, ईसापूर, न्याहरवानी, केसलवाडा या गावांचा समावेश होतो. सध्या ताप, सर्दी, खोकला अर्थात कोरोनासदृश रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अशा प्रसंगी उपकेंद्र बंद असल्याने जनसामान्यांनी काय करावे हा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या विरोधात एकवटले असून त्यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. आरोग्य समन्वयक अधिकारी एस. एम. रंगारी म्हणाले, मला पोहरा येथील आरोग्य केंद्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलावल्याने मी तिथे गेलो. एका कर्मचाऱ्याची प्रकृती बरी नसल्याने ते कार्यालयात हजर झाले नाही. त्यामुळे आरोग्य केंद्र बंद असल्याचे सांगितले.
कोट
या उपकेंद्रात अधिकारी-कर्मचारी राहत नाही. सर्व अधिकारी कर्मचारी अपडाऊन करतात. चार अधिकारी-कर्मचारी असताना सोमवारी एकही उपस्थित नव्हता.
किशोर मोहतुरे, अध्यक्ष छत्रपती संभाजी शेतकरी संघटना गुरठा