आशा, गटप्रवर्तकांचा बेमुदत संपाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:44+5:302021-06-16T04:46:44+5:30
भंडारा : आशा वर्कर, गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारपासून अनिश्चित कालीन संपाची हाक दिली. याप्रसंगी जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक ...
भंडारा : आशा वर्कर, गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारपासून अनिश्चित कालीन संपाची हाक दिली. याप्रसंगी जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक जिल्हा परिषद भंडारा प्रवेशद्वारासमोर बहुसंख्येने उपस्थित होते.
आशा व गटप्रवर्तक कृती समितीचे एक घटक आहे. त्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांची युनियन अर्थात सीआयटीयूचे वतीने घेतलेल्या निर्णयानुसार मंगळवारपासून बेमुदत संपाची हाक दिली.
या अनुषंगाने मंगळवारी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक जिल्हा परिषदेसमोर आशा व गटप्रवर्तक बहुसंख्येने उपस्थित होते. यासंबंधी उपस्थित संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आशा व गटप्रवर्तक यांना मागण्यांविषयी शासन दरबारी बेमुदत संप करण्याचे आव्हान उपस्थित संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबोधित केले. यात संघटनेचे सचिव प्रीती मेश्राम, उपाध्यक्ष सुनंदा बसेशंकर गटप्रवर्तक ,वर्षा जिभकाटे, अश्विनी बांगर, सोनू तीतीरमारे,आशा वर्कर मंदा मस्के, अनिता बेलपांडे, कुंदा चौरे, संगीता मस्के, सोनिया चौरे, माधुरी डोंगरे, माधुरी हुमणे, नीलम गौरी, सुनीता ठवकर, सुषमा कारेमोरे, मंगला मेश्राम, महानंदा बसंकर, मंगला गौरी, वैशाली तांडेकर आदी उपस्थित होते.
बॉक्स
अशा आहेत मागण्या
आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा देण्यात यावा व सामाजिक सुरक्षा पेंशन, मेडिकल योजना लागू करण्यात यावे, ४५, ४६व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन २२ हजार रुपये लागू करण्यात यावे, ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्तक यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मागील फेब्रुवारी एप्रिल २०२० पासून देण्यात यावा, गोवर लसीकरण ड्युटी आशांना बंधनकारक नाही तरी बळजबरीने धमकावून ड्युटी लावण्यात येत आहे, त्यासाठी मानधनाची विशेष कपात करून प्रति दिवस आशा गटप्रवर्तक यांना ५०० रुपये दैनिक भत्ता देण्यात यावा व इतर १५ मागण्यांसाठी अनिश्चित कालीन संप आयोजित करण्यात आला आहे.