लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून कृषी कर्मचारी कर्तव्य निभावत आहेत. मात्र तरीही शासनाकडून फ्रंन्टलाइन वर्कर नसल्याचे कारण दाखवत शासनाने अद्यापही कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात ५० लाखांचे विमा कवच अजूनही कृषी कर्मचाऱ्यांना दिले नाही.
कोरोना काळात शेतकऱ्यांच्या भाजीपाला,फळांचे होणारे नुकसान तसेच भाजीपाल्याचा कुठेही तुटवडा भासू नये यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावले. याकाळात कर्तव्य बजावताना ३५ कृषी अधिकारी,कर्मचाऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली नाही. यासाठी शासनाने ५० लाखांचे विमा कवचासह कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेसह, महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर राज्य राजपत्रित तांत्रिक कर्मचारी संघटनेने कृषी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भंडारा जिल्ह्यातही आजपर्यंत आठ जणांचा मृत्यु झाला आहे. राज्यात ३५ कृषी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक अधिकारी, कर्मचारी आज कोरोना संसर्गाने बाधित झाले असून आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र तरीही शासनाकडून कृषी कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय दिला जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे करून मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख सानुग्रह अनुदान तसेच अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी होत आहे राज्यात आजपर्यंत ३५ अधिकारी कर्मचाऱ्यांचा कोरून आणि मृत्यू झाला आहे. याकडे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी विशेष लक्ष घालून कृषी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.
ट्रेझरी विभाग फ्रंटलाइन वर्कर कसाn जे शासकीय विभाग थेट लोकांच्या संपर्कात येतात त्यांना शासनाने फ्रंटलाइन वर्कर म्हणून ५० लाखांच्या विमा योजनेचा लाभ दिला आहे. यात पोलीस,आरोग्य, होमगार्ड, महसूल,ग्रामविकास विभागाचे कर्मचारी ईतकेच नव्हे तर ट्रेझरी विभागात कार्यालयात काम करणारेही कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश केला आहे. तर दुसरीकडे दररोज कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांचा अनेक शेतकरी, स्थानिक पातळीवरील सरपंच,उपसरपंच,जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागाचे स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांशी दररोज संपर्क येत असतानाही आजपर्यंत फ्रंन्टलाइन वर्कर नसल्याचे सांगितले जात आहेत. कोरोना काळात कृषी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने सरकार टिका केली जात आहे.
लाॅकडाॅऊन काळातील कृषी कर्मचारी खरे कोरोना योद्धे आहेत. राज्यात भाजीपाला, फळांचा कुठेही तुटवडा पडू नये यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा निभावली. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यांनी खऱ्या अर्थाने कोरोनातही कर्तव्य निभावले त्यांना शासनाने त्वरीत न्याय द्यावा,अशी आमची मागणी आहे.- आनंद मोहतुरे, जिल्हाध्यक्ष, कृषी सहाय्यक संघटना, भंडारा
जिल्ह्यात आतापर्यंत आठ कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजही कर्मचारी कर्तव्यावर आहेत. मात्र कृषी कर्मचाऱ्यांना लस द्यायला विलंब केला. याशिवाय ५० लाख विमा याेजनेचा लाभ न दिल्याने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट आले आहे. फ्रंन्टलाइन वर्करमध्ये समावेश करुन कृषी कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ द्यावा.- गोपाल मेश्राम, कोषाध्यक्ष, कृषी सहाय्यक संघटना, भंडारा