अधिक व्याजाच्या आमिषात भंडारेकरांना कोट्यवधींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:03 PM2019-01-23T23:03:57+5:302019-01-23T23:04:21+5:30

आयुष्यभर पै-पै गोळा करून जमवलेली आयुष्याची पुंजी अधिक व्याजाच्या आमिषात शेकडो नागरिकांनी गमावली. एक-दोन टक्का अधिक व्याजासाठी खासगी वित्तसंस्थांत गुंतवलेले पैसे घेऊन या कंपन्या पसार झाल्या आहेत. एकट्या भंडारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा चुना या कंपन्यांनी लावला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत अशा फसवणूक करणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे.

Hundreds of billions of people in Bhandara | अधिक व्याजाच्या आमिषात भंडारेकरांना कोट्यवधींचा गंडा

अधिक व्याजाच्या आमिषात भंडारेकरांना कोट्यवधींचा गंडा

Next
ठळक मुद्देशेकडो ग्राहकांची फसवणूक : अनेकांनी गमावली आयुष्याची कमाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आयुष्यभर पै-पै गोळा करून जमवलेली आयुष्याची पुंजी अधिक व्याजाच्या आमिषात शेकडो नागरिकांनी गमावली. एक-दोन टक्का अधिक व्याजासाठी खासगी वित्तसंस्थांत गुंतवलेले पैसे घेऊन या कंपन्या पसार झाल्या आहेत. एकट्या भंडारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा चुना या कंपन्यांनी लावला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत अशा फसवणूक करणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे.
भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षात अधिक व्याज देणाºया वित्त संस्थांचे पेव फुटले आहे. या कंपनीत मिळणारी सौजन्याची वागणूक आणि घरी येणारा एजंट याची भुरळ पडून अनेकांनी आपले पैसे यात गुंतवले. राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा एक-दोन टक्का व्याज अधिक मिळत असल्याने अनेक जण त्यांच्या भूलथापांना बळी पडले. हजारो ग्राहकांनी अशा पद्धतीने पैसे गुंतवले. मात्र पैसे काढण्यासाठी गेल्यावर एक तर या कंपनीने पोबारा केल्याचे दिसून आले किंवा कंपनीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले.
भंडारा शहरातील हजारो ग्राहकांना मैत्रेय स्वर्णसिद्धी या कंपनीने तब्बल १५ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. एजंटांच्या माध्यमातून शहरातील मध्यमवर्गीयांकडून ठेवी जमा केल्या. आता ही कंपनी पसार झाली आहे. अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोन जणांना नाशिकवरून अटक केली आहे. मात्र अद्यापही शेकडो ग्राहकांचे पैसे परत मिळाले नाही. यालस्को रियल इस्टेट अ‍ॅग्रो फार्मींग लिमीटेड या कंपनीनेही शेतकºयांना असा गंडा घातला. या कंपनीने जिल्ह्यातील ५०० वर शेतकºयांची फसवणूक केल्याची माहिती आहे. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
जनसुरक्षा फाउंडेशनने १० लाखाने ग्राहकांची फसवणूक केली असून या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दि लाईफ इंडिया डेव्हलपर्स या कंपनीने जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांना दोन कोटी २१ लाख ७६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को आॅपरेटीव्ह कंपनीनेही अशीच नागरिकांची फसवणूक केली आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तोपर्यंत फसवणूक करणारे शहरातून पसार झाले होते. आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे गुंतवणूक करणाºयांमध्ये अनेक सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याची पुंजी यात लावली होती. काही नागरिकांनी तर दहा-दहा लाखापर्यंत गुंतवणूक केल्याची माहिैती आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ही मंडळी आता पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवित आहेत. परंतु हक्काची कमाई अशा पद्धतीने लंपास झाल्याने अनेकांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.
या वित्तीय कंपन्यांसोबतच सहकारी पतसंस्थांनीही काही ठिकाणी गंडा घातल्याचे दिसून येत आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील सृष्टी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने ग्राहकांकडून २३ लाख ५ हजार रुपयांची वसुली केली. मात्र ती संस्थेत भरली नसल्याचे पुढे आले तर लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील छत्रपती शिवाजी महाराज अकृषक सहकारी पतसंस्थेनीही २२ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला. बनावट दस्ताऐवज तयार करून संस्थेतील सभासदांचे पैसे घेतले. याप्रकरणी संचालकांसह व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल असून तिघांवर अटक करण्यात आली.
लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील विविध कार्यकारी सोसायटीला तर चक्क शिपायानेच गंडा घातला. शेतकरी सभासदांकडून वसूल केलेले चार लाख ६२ हजार रुपये संस्थेत भरलेच नाही. या प्रकरणी आता लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरात अशा पद्धतीने अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. शेकडो ग्राहकांची फसवणूक झाल्याने तपासणीसाठी विलंब लागत आहे.
पैसे गुंतवताना दहादा विचार करा
कोणत्याही योजनेत अथवा वित्तीय संस्थेत पैसा गुंतविताना दहादा विचार करण्याची गरज आहे. राष्ट्रीयकृत बँकांसह पोस्टाच्या विविध योजना आहेत. यातून व्याज कमी मिळत असले तरी पैसा परताव्याची हमखास गॅरंटी असते. मात्र अनेक जण खासगी वित्तीय संस्थांच्या आमिषाला बळी पडतात. यासोबतच जिल्ह्यात नोकरीचे आमिष देऊन गंडा घालण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात पुढे आले आहे. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सजग असणे आवश्यक झाले आहे.

Web Title: Hundreds of billions of people in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.