हुर्ररररर....ऐवजी घुमणार ट्रक्टरचा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:29 AM2021-01-14T04:29:02+5:302021-01-14T04:29:02+5:30
मोहाडी : उलट्या धावनीचा शंकरपट कधी पाहिला आहे का, आहे ना नवलच. त्यासाठी तुम्हाला असा अजब शंकरपट बघायला मकर ...
मोहाडी : उलट्या धावनीचा शंकरपट कधी पाहिला आहे का, आहे ना नवलच. त्यासाठी तुम्हाला असा अजब शंकरपट बघायला मकर संक्रांतीला मोहाडी तालुक्यातील डोंगरगावात यावे लागेल. त्या शंकर पटात हुर्ररररर....ऐवजी ट्रॅक्टरचा आवाज घुमणार आहे.
छंद आणि हौसेला कुठलेच मोल नसते. आपल्या छंदापायी अनेक जण खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. हुर्ररररर....ग्रामीण भागात बैलजोडी शर्यतीच्या वेळी उमटणारा आवाज. मात्र, न्यायालयाच्या बंदीमुळे तो बंद झाला आहे, तरी पटाचे रसिक त्यातून पर्याय शोधूनच काढतात अन् आपला छंद जोपासत असतात. असाच छंद जोपासरा डोंगरगावचा अवलिया रामकृष्ण इटनकर याने ट्रॅक्टरचा शंकरपट संक्रांतीच्या मुहूर्तावर डोंगरगावच्या मैदानावर आयोजित केला आहे. या पटाची विशेषतः अशी या ट्रक्टरच्या पटात ट्रॅक्टर धावपट्टीवर उलट दिशेने धावणार आहेत.
डोंगरगाव येथे तीळसंक्रांती सणाचा औचित्य साधून शंकरपट आयोजित केला जात होते. डोंगरगावाच्या शौकिनांनी मागील शंभर वर्षांपासून शंकरपटाची परंपरा टिकवून ठेवली आहे. बैलाच्या शंकर पटला न्यायालयाच्या खोडा असल्याने, या वर्षी ‘आदर्श ट्रँक्टरचा रीवर्स यांत्रिक पट’ असा या पटाला नाव दिले गेले आहे. १५ व १६ जानेवारी रोजी या अनोख्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे.
पूर्वी परंपरागत पट भरायचे. त्याला आता बंदी आली आहे. त्यानंतरच घोड्यांचा पट भरविला, तो पट खर्चाला परवडणारा नव्हता. त्यामुळे आता ट्रॅक्टरच्या पटाचे आयोजन केले आहे.
रामकृष्ण ईटनकर
पटाचे आयोजक, डोंगरगाव ता. मोहाडी