बहिणीला फोन केला म्हणून जावयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:40 AM2021-09-12T04:40:14+5:302021-09-12T04:40:14+5:30

भंडारा : बहिणीला फोन का केला, असे म्हणून जावयाला मारहाण करण्याची घटना पवनी तालुक्यातील भुयार येथे घडली. याप्रकरणी साळ्याविरुद्ध ...

I called my sister and beat her up | बहिणीला फोन केला म्हणून जावयाला मारहाण

बहिणीला फोन केला म्हणून जावयाला मारहाण

Next

भंडारा : बहिणीला फोन का केला, असे म्हणून जावयाला मारहाण करण्याची घटना पवनी तालुक्यातील भुयार येथे घडली. याप्रकरणी साळ्याविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार दिलीप गजभिये (३१), रा. भुयार असे जखमी जावयाचे नाव आहे. तर सचिन रामू मेश्राम (२२), रा. भुयार असे आरोपी साळ्याचे नाव आहे. तुषारचा घरगुती कारणावरून पत्नीसोबत वाद झाला होता. गावातच माहेर असल्याने ती आपल्या माहेरी गेली. गत वर्षभरापासून ती माहेरीच राहत आहे. दरम्यान तुषारने आपल्या पत्नीला फोन केला. त्यावेळी साळा सचिनने फोन उचलून तुषारला शिवीगाळ केली. एवढेच नाही तर गावातील बसस्थानकावर जाऊन जावई तुषारसोबत वाद घालून त्याला मारहाण केली. त्यात त्याचे डोके फुटले. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आरोपी साळ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: I called my sister and beat her up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.