चिमुकल्यांची अवस्था पाहून मन विव्हळत होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:33 AM2021-01-13T05:33:22+5:302021-01-13T05:33:22+5:30
घटनेची माहिती होताच, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव आणि नगरपरिषदेचे प्रमुख फायर अधिकारी फाल्गुन वाढई रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्याच मार्गदर्शनात ...
घटनेची माहिती होताच, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव आणि नगरपरिषदेचे प्रमुख फायर अधिकारी फाल्गुन वाढई रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्याच मार्गदर्शनात ही दीड तासांची लढाई आम्ही लढली, असे फायरमन सांगत होेते.
बॉक्स
हात भाजले तरी मदत थांबली नाही
चिमुकल्यांना बाहेर काढताना आमचे हात भाजले, परंतु त्यावेळी त्याची जाणीवही झाली नाही. डोळ्यासमोर केवळ चिमुकले जीव दिसत होते. त्यांना कसे वाचविता येईल, याचेच विचार मनात होते. त्या चिमुकल्यांचे देह पाहून मन कासावीस होत होते, असे वाहन चालक हमीद खान पठाण यांनी सांगितले.
बॉक्स
दहा चिमुकले वाचले असते, तर मदतीचे चीज झाले असते
या घटनेत दहा निष्पाप बाळांचा बळी गेला. या दहाही बाळांना आम्हाला वाचविता आले असते, तर आमच्या मदतीचे खरे चीज झाले असते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. धुराने काळवंडलेले देह पाहून हृदयात कालवाकालव होत होती. आजही ती घटना आठवली की, अंगावर काटा येतो, असे या बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या चारही फायरमननी सांगितले.