अवैध गो तस्करी करणाऱ्या पिकअपची ट्रकला धडक, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 05:05 PM2021-10-26T17:05:04+5:302021-10-26T17:49:54+5:30

कोळसा वाहून नेणाऱ्या एका ट्रकला अवैध गो वाहतूक करणाऱ्या पिकपने जोरदार धडक दिली. या घटनेत पिकपचा चेंदामेंदा झाला असून पिकप चालक गंभीर जखमी झाला आहे.

Illegal cattle smuggling pickup truck hit, driver injured | अवैध गो तस्करी करणाऱ्या पिकअपची ट्रकला धडक, चालक जखमी

अवैध गो तस्करी करणाऱ्या पिकअपची ट्रकला धडक, चालक जखमी

Next

भंडारा : अवैध गो वाहतूक करणाऱ्या पिकपने कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही घटना आंधळगाव येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत पिकप चालक जखमी झाला तर, सहा जनावरे थाेडक्यात बचावली. जखमी चालकाला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रात्रीच्या सुमारास आंधळगाव  पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जंगल व्याप्त गावातून मोठ्या प्रमाणात अवैध जनावराची तस्करी, मॅगनीज, रेती, मुरूम व अन्य प्रकारच्या चोरींचे प्रकार घडत असल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने या मार्गावर अशा प्रकारचे नेहमीच अपघात होत असतात. 

रामटेककडून रात्री १ च्या सुमारास एक ट्रक कोळसा वाहून नेत होता. दरम्यान कांदरी वनविभाग ऑफिस समोरील रामटेक तुमसर अवैधरित्या गो वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकपने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. यात चालक फिरोज खान शेख जखमी झाला असून याला आंधळगाव पोलिसांनी मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. सदर पिकपमधून ६ जनावरे नेली जात होती, त्यांची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश भट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पिकपमधील सहा जनावरे चिखला येतील गोशाळेत पाठविण्यात आली. या अपघाताप्रकरणी ट्रकचालक छत्रपती सिंग रघुवंशी (वय ३६, जि. जिल्हा सतना) याच्या तक्रारीवरुन पिकपचालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Illegal cattle smuggling pickup truck hit, driver injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.